Small Savings Schemes | केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात केला नाही बदल, इतकी होईल कमाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Small Savings Schemes | अर्थ मंत्रालयाने गुरुवारी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजनेसह (SSY) छोट्या बचत योजनांच्या (Small Savings Schemes) व्याजदरात लागोपाठ सहाव्यांदा कोणताही बदल केला नाही. याचा अर्थ हा आहे की, ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत पोस्ट ऑफिसच्या या छोट्या योजनांसाठी जुनेच व्याजदर कायम राहतील. याशिवाय, ऑक्टोबर-डिसेंबर 2021 तिमाहीत केलेल्या नवीन गुंतवणुकीवर सुद्धा मागील तिमाहीप्रमाणेच व्याजदर मिळेल.

मंत्रालयाच्या सर्क्युलरनुसार पीपीएफवर 7.10 टक्के, एनएससीवर 6.8 टक्के आणि पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीममधून 6.6 टक्केची कमाई होईल.
सोबतच ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी व्याजदर 7.4 टक्के राहील. 5 वर्षांच्या मंथली इन्कम स्कीमवर 6.6 टक्के व्याजदर लागू आहे.
(Small Savings Schemes) तर 5 वर्षांची एनएससी वार्षिक 6.8 टक्के कम्पाऊंडींग ऑफर करत आहे.
1 वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिटवर व्याजदर 5.5 टक्के आहे तर 5 वर्षाच्या जमा रक्कमेवर हा दर 6.7 टक्के प्रतिवर्ष आहे.

अर्थ मंत्रालयाच्या सर्क्युलरनुसार आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसर्‍या तिमाहीसाठी विविध छोट्या बचत योजनांवर व्याजदर 1 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होऊन 31 डिसेंबर 2021 ला समाप्त होईल.
छोट्या बचत योजनांसाठी व्याजदर तिमाही आधारावर अधिसूचित केला जातो.

 

एक वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 5.5 टक्के व्याजदर जारी राहील. सुकन्या समृद्धी योजना खात्यावर 7.6 टक्के व्याज मिळेल.
पाच वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर व्याजदर 7.4 टक्के कायम आहे.सेव्हिंग अकाऊंटवर व्याजदर 4 टक्के प्रतिवर्ष आहे.
एक ते पाच वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर व्याजदर 5.5-6.7 टक्केच्या दरम्यान असेल, ज्याचे पेमेंट तिमाहीत केले जाईल.
तर पाच वर्षाच्या रिकरिंग डिपॉझिटवर व्याजदर 5.8 टक्के उच्च व्याज मिळेल.

 

Web Title : Small Savings Schemes | central government has not changed interest rates of small savings schemes know how much will be earned on investment

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ashish Shelar | आमदार आशिष शेलारांकडून सूचक विधान, म्हणाले – ‘2 पक्षांकडून भाजपाला संकेत मिळाताहेत’

Dhananjay Munde | ‘अनेक दिवस अमेरिकेत गायब होत्या’; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंवर टीकास्त्र

Maharashtra Rains | …म्हणून आगामी 4 दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता