Brain-Eating Amoeba | मुलाच्या शरीरात शिरला असा ’किडा’, खाऊन टाकले मेंदूच्या आतील सर्वकाही! डॉक्टरसुद्धा वाचवू शकले नाही जीव

टेक्सास : वृत्तसंस्था –  Brain-Eating Amoeba | अमेरिकेच्या (America) टेक्सास (Texas) मध्ये एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. येथे पार्कमध्ये खेळण्यासाठी गेलेल्या मुलाच्या बाबतीत एक अशी घटना घडली की, काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. हा मुलगा स्प्लॅश पॅडमुळे ब्रेन ईटिंग अमीबाच्या (Brain-Eating Amoeba) संपर्कात आला. अमीबा नाक किंवा तोडाद्वारे मुलाच्या मेंदूत गेला, ज्यामुळे 6 दिवसांच्या आत मुलाचा मृत्यू झाला.

का आहे इतका धोकादायक?

सार्वजनिक पार्कमध्ये स्प्लॅश पॅडवर लावलेल्या स्प्रिंकलर, फवारे, नोझल आणि इतर पाण्याच्या स्प्रेची वेळोवेळी स्वच्छता होऊ शकत नसल्याने यामध्ये
ब्रेन ईटिंग अमीबा जमा होतात आणि लोकांना धोका उत्पन्न होतो. हा Amoeba नाक किंवा तोंडाद्वारे शरीरात घुसल्यास जीवघेणा ठरू शकतो.
माहितीनुसार या ब्रेन ईटिंग अमीबाने संक्रमित होणारे 95 टक्के लोकांचा मृत्यू होतो.

टेक्सास शहरातील अर्लिंग्टनच्या अधिकार्‍यांनी म्हटले की, शहर आणि टॅरेंट कौऊंटी पब्लिक हेल्थला 5 सप्टेंबरला कळवण्यात आले होते की,
एका मुलाला अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिसच्या संसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते जिथे त्याचा मृत्यू झाला.
अस्वच्छतेमुळे पाणी असलेल्या अशा ठिकाणी अमिबा वाढतात. (Brain-Eating Amoeba)

 

Web Title : Brain-Eating Amoeba | young boy dies after brain eating amoeba gets into skull at water park

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sukanya Samriddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजनेवर मिळत राहील सर्वात जास्त व्याज, जाणून घ्या काय आहेत इतर फायदे

Pune Crime | विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत ब्लेडने केले वार, 7 जणांवर FIR

Pune Crime | रेडाच्या ढुशीने तरुणाचा हात फॅक्चर, अवघड जागी खुपसले ‘शिंग’; रेड्याचा मालक ‘गोत्यात’