स्वाभिमान ! सलमानच्या ‘या’ हिरोइननं आजपर्यंत कधीच मागितलं नाही त्याच्याकडे काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री स्नेहा उल्लालने २००५ साली ‘लकी नो टाईम फॉर लव्ह’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात ती सलमान खान सोबत झळकली होती. मात्र, स्नेहा सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी, तिचा चेहरा ऐश्वर्या राय सोबत मिळत असल्याने आजही ती प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

सलमान खानने तिला लकी या चित्रपटातून लाँन्च केलं. सलमानची साथ लाभल्यावरही स्नेहाला पाहिजे तसे यश प्राप्त झाले नाही. शेवट २०१५ ‘बेजुबान इश्क’ सिनेमांत झळकली होती. पण त्यानंतर ती सिनेमा सिनेइंडस्ट्रीतून अचानक गायब झाली.

तिने एका मुलाखतीत सांगितलं की, तीन वर्षे तिने एका गंभीर आजाराशी लढा दिला. स्नेहाला ऑटोइम्यून डिसऑर्डरने हा आजार असून तो रक्ताशी संबंधित असतो. त्यामुळे ती अतिशय अशक्त झाली होती. तिला अर्धा तास सुद्धा आपल्या पायावर उभा राहता येत नव्हते. या आजारामुळे ती दीर्घ काळ सिनेमांपासून दूर राहिली.

View this post on Instagram

Oh Corona , wtf baby

A post shared by Sneha Ullal (@snehaullal) on

सततची शूटिंग, चालणे, डान्स करणे यामुळे तिला थकवा जाणवू लागला. नंतर शुटिंगपासून स्नेहाने ब्रेक घेऊन योग्य उपचार घेतले. काम करत असताना दर दुसऱ्या दिवशी ती पडायची. आता ती एकमद फिट असून तिला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. कोणत्याही अडथळा शिवाय ती काम करु शकते.

स्नेहा म्हणाली, ज्यावेळी ‘लकी’ सिनेमा भेटला होता तेव्हा फक्त मी १८ वर्षाची होती. त्याचं काळात सिनेमामुळे माझे शिक्षण अर्धवट राहिले. मात्र, शूटिंग झाल्यावर ते मी पूर्ण केले. त्यानंतर साऊथमध्ये बिझी झाले. तेथे काम जास्त होते. म्हणून बॉलिवूडपासून लांब राहणेच पसंत केले.

View this post on Instagram

KEEP IT REAL #keepitreal #snehaullal

A post shared by Sneha Ullal (@snehaullal) on

चित्रपटांमध्ये परत काम करण्याबात स्नेहा म्हणाली,”मी इंडस्ट्री सोडली नव्हती. फक्त आजार पणामुळे काही दिवसांची विश्रांती घेतली होती. त्यामुळे कमबॅकचा प्रश्नच येत नाही.”

You might also like