…म्हणून अभिनेता खा. रवी किशन संसद सोडून मुलीसाठी मुंबईला पोहोचले !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी सुपरस्टार आणि गोरखपूरचे खासदार रवी किशन यांची मुलगी रीवा किशनचं स्वप्न लहान वयातच पूर्ण झालं आहे. रीवा 22व्या वर्षीच अ‍ॅक्ट्रेस बनली आहे. तिला लहानपणापासूनच अ‍ॅक्ट्रेस व्हायचं होतं. रीवाचा पहिला सिनेमा सब कुशल मंगल चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच मुंबई मध्ये लाँच करण्यात आला होता. ट्रेलर लाँचिंग दरम्यान रीवासोबत वडिल रवी किशन आणि प्रीती किशनही दिसली होती. मुलीच्या पहिल्या सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंगबद्दल रवी किशन आनंदी आणि भरपूर उत्साही दिसले.

रीवा खूपच स्टायलिश आहे. ती सोशलवर नेहमीच सक्रिय असते. रीवानं अमेरिकेत ड्रामा आणि थिएटरचं शिक्षण घेतलं आहे. अडीच वर्ष तिनं नृत्यही शिकलं. नंतर नसीरुद्दीन शहांच्या मुलीच्या संपर्कात अ‍ॅक्टींगचे पैलू शिकून घेतले. आता सिनेमासाठी ती सज्ज आहे. सोशलवर आपल्या फोटोंमुळे रीवा अनेकदा चर्चेत आली आहे.

आपल्या आई-वडिलांच्या सपोर्टबद्दल बोलताना रीवा म्हणाली, “माझ्या वडिलांनी प्रत्येक गोष्टीचं मला मार्गदर्शन केलं. हे माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरलं. आशा करते भविष्यातही ते मला असाच सपोर्ट करतील आणि माझ्या पाठीशी उभे राहतील.” रीवाचा हा डेब्यू सिनेमा आहे.

सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर सब कुशल मंगल हा सिनेमा 3 जानेवारी रोजी देशात रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन करण विश्वनाथ कश्यप यांनी केलं आहे. नितीन मोहन यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. यात रीवाचा निर्भिड आणि बोल्ड अवतार दिसणार आहे. या अभिनेता अक्षय खन्ना आणि पद्मिनी कोल्हापुरेंचा मुलगा प्रियांक शर्माही दिसणार आहेत. दोघांनाही रीवाशी लग्न करायचं आहे अशी सिनेमाची कथा आहे. रीवानं मंदिरा नावाची भूमिका साकारली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like