सोशल मीडिया आणि गुगल वर ‘धडक’ सैराट

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूरच्या ‘धडक ‘ चित्रपटाचा ट्रेलर काल मुंबईत रिलीज झाला. हा चित्रपट म्हणजे मराठीतील तुफान गाजलेल्या सैराट चित्रपटाचा रिमेक आहे. काल ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच देशभर ‘धडक ‘ सोशल नेवर्कींग साईटस वर खूप गाजत आहे. सोशल मीडियावर आणि गुगलवर धडक चा सर्वात जास्त बोलबाला आहे. एवढेच काय गुगल ट्रेंड्सवर देखील सर्वाधिक सर्च केलेल्या घटनांमध्ये धडक पहिल्या पाच मध्ये आहे.

काल दिवसभरात धडक ट्रेंड्सवर सैराट होता. सैराट ने बॉक्स ऑफिस कोटींची कमाई केल्यानंतर बहुचर्चित हिंदी रिमेक धडक सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये कुतूहल होते. आर्ची आणि परश्या प्रमाणे जान्हवी आणि ईशान ची जोडी कशी असेल याचे कुतूहल प्रेक्षकांमध्ये होते.

सोशलवर ‘धडक’ला संमिश्र प्रतिसाद

धडक रिलीज झाल्यानंतर गूगल वर सर्वाधिक सर्च झालेल्या घटनांमध्ये आघाडीवर आहे. पण सोशल नेटवर्किंग साइटस मध्ये चांगल्या – वाईट अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी सैराट चित्रपटच सरस असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर काही लोकांनी हा चित्रपट सैराट प्रमाणे खूप लोकप्रिय होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटातील आणखीन एक विशेष बाब म्हणजे या चित्रपटात श्रीदेवी यांची कन्या जान्हवी हिची प्रमुख भूमिका आहे. आता चित्रपट किती गाजेल ,बॉक्स ऑफिस वर किती कमाई करेल हे येणारा काळच सांगेल.