कोरोना पासपोर्ट : क्रिकेट, फुटबॉल मॅच पाहणे किंवा काही खास देशांच्या प्रवासासाठी होईल वापर

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – क्रिकेट आणि फुटबॉल मॅच पहायची असेल किंवा शाळेत जाणे किंवा काही खास देशांचा प्रवास, येत्या काही दिवसात या सर्व कामांसाठी ‘कोरोना पासपोर्ट’ सर्वांनी आपल्या जवळ ठेवण्याचा नियम लागू केला जाऊ शकतो. अमेरिकेत याची सुरूवात होत असल्याचे दिसत आहे. हा कोरोना पासपोर्ट कोविड-19 लसीकरणाचे सर्टिफिकेट किंवा कोविड-19 निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट असू शकतो.

तज्ज्ञांनुसार जगभरात अशा प्रकारच्या सर्टिफिकेटवर काम सुरू झाले आहे. अमेरिकेत अनेक मंत्र्यांनी याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, यामुळे शाळांपासून व्यापार-उद्योग पुन्हा सुरू करण्यात मदत होईल. शॉपिंग स्टोअरवर कस्टमर परततील आणि शाळांमध्ये विद्यार्थी परततील. यामुळे कोरोनाला पसरण्यापासून रोखण्यात मदत होऊ शकते.

अनेक देशांनी अंतरराष्ट्रीय प्रवाशांवर प्रतिबंध लावला आहे, तो बंद करण्याची मागणी अनेक देश करू शकतात. अशाच प्रकारे लसीकरणाचे सर्टिफिकेट यलो फिव्हर आणि पोलिओसाठी अनेक देश अगोदरपासूनच मागणी करत आहेत.

विरोधकांनी म्हटले, हा कायदेशीर गुन्हा
दुसरीकडे कोरोना पासपोर्टच्या अनिवार्यतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अमेरिकेत रिपब्लिकन गव्हर्नरच्या अंतर्गत येणार्‍या काही राज्यांमध्ये असे आदेश जारी करण्यात आले आहेत, ज्यामध्ये कुणाकडून लसीकरणाचा पुरावा मागणे गुन्हा मानले गेले आहे. यास वैयक्तिकता आणि लोकांच्या सुरक्षेचा मुद्दा सुद्धा मानले जात आहे.