Sonakshi Sinha | अभिनयातील ‘अ’ देखील येत नाही…; सोनाक्षी सिन्हावर ‘या’ अभिनेत्रीने केली जहरी टीका

पोलीसनामा ऑनलाइन – Sonakshi Sinha | छोट्या पडद्यावरील हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने ओळख निर्माण करणारी प्रसिद्ध अभिनेत्री काम्या पंजाबी (Kamya Punjabi) ही कायम तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. काम्याने नुकतेच बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिला तिच्या अभिनयावरुन धारेवर धरले आहे. अभिनेत्री काम्या पंजाबी हिने आत्तापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र नवे माध्यम म्हणून उदयास येत असलेल्या OTT प्लॅटफॉर्मवर अजून तिने पदार्पण केले नाही. एका कार्यक्रमादरम्यान तिला याबाबत विचारले असता तिने चोख उत्तर तर दिले मात्र नाव न घेता सोनाक्षीवर टीका केली आहे.

Advt.

काम्या एका कार्यक्रमात सहभागी झाली होती तिथे तिला OTT वर काम करण्याबाबत प्रश्न विचारला असता ती म्हणाली, “मला टेलिव्हिजनवर (Television) काम करायला जास्त आवडते. मला वाटते तुम्ही छोट्या पडद्यावर काम करत असाल किंवा मोठ्या पडद्यावर प्रत्येक अभिनेता हा अभिनेता असतो. आजकाल मोठ-मोठे कलाकार सुद्धा त्यांच्या वेबसीरिजचे प्रमोशन करण्यासाठी टीव्ही शोमध्ये येतात.”

काम्या पंजाबी पुढे म्हणाली की, “टीव्ही, ओटीटी किंवा चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांमध्ये फरक नसावा. ज्या कलाकारांना अभिनय सुद्धा करता येत नाही त्यांना मोठमोठे निर्माते (Producers) कास्ट करतात ही अत्यंत दु:खद परिस्थिती आहे.”

एका वेब सीरिजचे उदाहरण देत काम्याने सोनाक्षीवर निशाणा साधला.
ती म्हणाली की, “ओटीटीवर असे कित्येक कलाकार आहेत ज्यांना अभिनयातील ‘अ’ देखील येत नाही.
माफ करा… मी त्यांचे नाव घेणार नाही. नुकतीच मी एक सीरिज बघत होते त्यात एका मोठ्या व्यक्तिमत्वाच्या
मुलीने पदार्पण केले आहे. पण, मी एकही एपिसोड नीट पाहिला नाही. त्या मुलीला अजिबात अभिनय करता येत नव्हता,
परंतु यावर कोणीच काही बोलू शकत नाही, कारण ती एका मोठ्या स्टारची मुलगी आहे.”

काम्या पंजाबीने सोनाक्षी सिन्हाचे (Sonakshi Sinha) नाव न घेता अप्रत्यक्षरित्या तिच्यावर आणि
तिच्या अभिनयावर टीका केली आहे. सोनाक्षी सिन्हाने नुकतेच ‘दहाड’ वेब सीरिजच्या (Dahad web Series) माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले आहे.

Web Title :  Sonakshi Sinha | kamya punjabi talks about sonakshi sinha dahaad amazon prime web series says she dont know how to act

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News |  धक्कादायक! येरवडा कारागृहात सापडला आणखी एक मोबाईल

ACB Trap Case News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सहायक उद्यान निरीक्षक आणि उपलेखापाल लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune PMC News | रस्ते सुशोभीकरणासाठी मोठ्या कुंड्या आणि झाडांची खरेदी वादात ! कुंड्या आणि झाडांच्या किंमतीबाबत खातरजमा करूनच खरेदीचा निर्णय घेण्यात येईल – महापालिका आयुक्त विक्रम कुमार