अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सांगितले ‘दबंग ३’ चे ‘हे’ सिक्रेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सुपरहिट चित्रपट ‘दबंग’ च्या तीसऱ्या सीजनमध्ये पुन्हा एकदा रज्जोच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपुर्वी असे समजले होते की, चित्रपटामध्ये सोनाक्षीसोबत अजून एक अभिनेत्री असणार आहे. सलमान खानच्या या स्टार चित्रपटामध्ये लव ट्रॅंगल होण्याची चर्चा खूप होती. या सगळ्या गोष्टींबद्दल सोनाक्षीने खुलासा केला आहे.

सोनाक्षी सिन्हाचे म्हणणे आहे की, दबंग ३ मध्ये कोणताच लव ट्रॅंगल असणार नाही. निश्चितपणे या चित्रपटाची कथा वेगळी असणार आहे. या चित्रपटात नवीन भूमिकापण असणार आहे. कारण आम्ही प्रेक्षकांना चित्रपटातून वेगळे काहीतरी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला वाटते की, हा खूप चांगला चित्रपट असणार आहे.

View this post on Instagram

Thats my weekend smile! #friyay

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona) on

सोनाक्षीने मिडियासोबत बोलताना म्हणाली की, ‘या चित्रपटात मुन्नी नाही तर मुन्ना असणार आहे. यामुळे चित्रपट पहायला प्रेक्षकांना मजा येणार आहे’. या चित्रपटाला प्रभू देवा डायरेक्ट करणार आहे. अभिनेता सलमान खान आणि अरबाज खान चित्रपटाचे निर्माते आहे. चित्रपटातून सोनाक्षी आणि सलमानचा लुक प्रदर्शित झाला आहे.

सोनाक्षीने मागच्या दोन चित्रपटात सलमानच्या पत्नीची भूमिका साकारली होती. दबंग चित्रपटातूनच सोनाक्षीने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. असे समजले आहे की, दबंग ३ मध्ये सोनाक्षीची भूमिका खूप कमी असणार आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये शेवटच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. चाहते चुलबुल पांडेची ऑनस्क्रीन मस्ती पाहण्यास खूप उत्सुक आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’

You might also like