अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या स्टनिंग ‘लूक’चा सोशलवर ‘बोलबाला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला आपण सगळेच जाणता. तिने आपल्या अभिनयाने आणि त्याचबरोबर डान्सने चाहत्यांवर जादू केली आहे. तिच्या डान्सचे जलवे पाहून चाहते थक्क होतात. सोनाली आपल्या डान्सचा जलवा नेहमी चित्रपटात दाखवित असते. तिने मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिला मराठी चित्रपटसृष्टीत सोनाली ऐवजी ‘अप्सरा’ या नावाने ओळखले जाते.

तिने मेहनत करुन मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीत ‘बकुळा नामदेव घोटाळे’ मधून पदार्पण केले. या चित्रपटाकरिता तिला ‘झी गौरव पुरस्कार’ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. तिने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. सोनाली ही तिच्या ‘नटरंग’ चित्रपटामधील ‘अप्सरा आली’ या लावणीनृत्यासाठी ओळखली जाते. तिने ‘क्षणभर विश्रांती’, ‘अजिंठा’ आणि ‘झपाटलेला २’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सोनाली ही अशी अभिनेत्री आहे जी, आपल्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असते. ती सोशल मिडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. सोनाली प्रत्येक क्षण आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते. ती चाहत्यांवर खूप प्रेम करते त्यामुळे मोठ्या संख्येने चाहते तिला फॉलो करत असतात. सोनालीने काही तासापुर्वी सोशल मिडियावर फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती स्टनिंग करताना दिसत आहे. सोनालीचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. फोटोतील तिच्या अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत. अनेक चाहत्यांनी तिला मेसेज केले आहे.

त्याचबरोबर चाहत्यांनी फोटोला लाइक देखील केले आहे. सध्या सोनाली लंडनमध्ये आहे. ती भारत आणि बांग्लादेशच्या सामन्या दरम्यान टिम इंडियाला चीअर अप करण्यासाठी गेली होती.

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप