Sonam Kapoor | अभिनेत्री सोनम कपूर लवकरच करणार दमदार कमबॅक; यशराज फिल्म्स सोबत हातमिळवणी

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडमधील फॅशन ऑयकॉन म्हणून प्रसिद्ध असेलली अभिनेत्री सोनम कपूर (Actress Sonam Kapoor) ही अनेक महिन्यांपासून मनोरंजन विश्वपासून लांब आहे. सोनमने तिच्या अभिनयाने आणि फॅशनने अनेक चाहते मिळवले आहेत. अभिनेता अनिल कपूरची (Actor Anil Kapoor) मुलगी असलेल्या सोनमने इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र अनेक वर्ष तिचा कोणताही सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आलेला नाही. पण आता चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून अभिनेत्री सोनम कपूर लवकरच पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. सोनमने आता यशराज फिल्म्स टॅलेंटशी करारबद्ध झाली आहे.

अभिनेत्री सोनम कपूरने 2007 साली ‘सावंरिया’ (Saawariya) चित्रपटातून बॉलीवुडमध्ये (Bollywood) पदार्पण केले. त्यानंतर तिने नीरजा (Neerja), रांझणा (Raanjhanaa), वीरे दी वेडिंग (Veere Di Wedding), प्रेम रतन धन पायो (Prem Ratan Dhan Payo) यासारखे हिट चित्रपट दिले. त्यानंतर सोनम आनंद आहूजा (Anand Ahuja) सोबत विवाहबध्द झाली. सोनमने 2022 साली गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचे नाव वायु (vau Ahuja) असे आहे. सोनम पूर्णपणे संसारात व्यस्त झाल्यामुळे ती मनोरंजन क्षेत्रापासून लांब गेली होती. आता सोनम कपूरच्या दमदार पुनरागमनाची व जबाबदारी आता वायआरएफ टॅलेंटकडे असणार आहे.

या क्षेत्रात ‘स्टार-मेकर’ अशी ओळख असणाऱ्या बुटिक एजन्सी वायआरएफ टॅलेंटने (YRF Talent) यापूर्वी रानी मुखर्जी (Rani Mukerji), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), रणवीर सिंग (Ranveer Singh), आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana), भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ह्यासारख्या उत्कृष्ट अभिनेत्यांच्या करिअरचे व्यवस्थापन केले आहे. सध्या ते नवोदित अभिनेत्या शर्वरी (Sharvari Pande) आणि अहान पांडे (Ahaan Panday) यांच्या करिअरचे व्यवस्थापन करत आहे. या दोघांकडे भारतातील पुढचे सुपरस्टार्स म्हणून बघितले जात आहे. यापुढे वायआरएफ टॅलेंट बॉलीवुडची अभिनेत्री सोनम कपूरला नवा ब्रॅण्ड म्हणून प्रकाशझोतात आणणार आहे. ते सोनम कपूर’ला स्थानिक व जागतिक स्तरावर आकार देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. वायआरएफने प्रथमच त्यांनी लॉंच न केलेल्या अभिनेत्रीशी असा करार केला आहे. सोनमचे पुनरागमन दोन महत्त्वाकाक्षी प्रकल्पांद्वारे होणार आहे. मात्र ते कोणते असतील त्यासंदर्भातील अधिक माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. (Sonam Kapoor Upcoming Projects)

सोनमला एक चाकोरीबाह्य ब्रॅण्ड ओळख मिळवून देण्यावर वायआरएफ टॅलेंट बारकाईने काम करणार आहे.
सर्व बाबतीत ‘कूल’ असणे अशी तिच्या ब्रॅण्डची ओळख असणार आहे.
फिल्म्सच्या निवडीपासून ते सर्वांत मोठ्या जागतिक फॅशन व लग्झरी ब्रॅण्ड्सशी असलेल्या तिच्या
नैसर्गिक समन्वयापर्यंत आणि एक स्वतंत्र विचारांची काम करणारी आई म्हणून जीवनशैलीच्या निवडीपर्यंत
सगळे काही ‘कूल’ आहे. सोनम (Sonam Kapoor) कामाच्या ठिकाणी नेहमीच स्त्रियांच्या पाठीशी उभी राहिली आहे.
त्यामुळे ती स्त्रिया व त्यांच्या हक्कांची पुरस्कर्तीही आहे.
तिचे पुढची दिशादर्शक वायआरएफ टॅलेंट असणार असून ती तिचे करिअर व्यवस्थापकाची भूमिका पार पाडणार आहे.

Web Title : Sonam Kapoor | sonam kapoors comeback on the silver screen soon teaming up with yash raj talent

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | अट्टल गुन्हेगार विवेक यादव याच्याविरूध्द एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई

Data Hack By Android Apps | अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांचा डेटा होतोय चोरी; ‘हे’ ॲप्स लगेचच करा डिलीट

Indurikar Maharaj | इंदुरीकर महाराजांना कोर्टाचा दणका, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना निर्देश