‘सोनीया गांधींची मोफत लसीकरणाची मागणी, मात्र सरकारमधील मंत्री सत्ता लालसेमुळे नांग्या टाकून बसलेत’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस अध्यक्षा सोनीया गांधी यांनी मोफत लसीकरणासाठी आग्रह धरला आहे. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे नेते सत्तेसाठी लाचार झाले आहेत, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. ते आज सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गोपीचंद पडळकर म्हणाले, मोफत लसीकरण करण्यासाठी सोनीया गांधी आग्रही आहेत. तर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. पण काँग्रेस मधील नेते सत्तेसाठी लाचार आहेत. त्यांनी सत्तेसाठी नांग्या टाकल्या आहेत, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धान्य वाटप आणि मदत देतो. पण अद्याप ही मदत मिळालेली नाही. प्रत्येक घरात कोरोना निघाल्यावर मदत मिळणार आहे का, असा सवाल पडळकर यांनी विचारला आहे.

आदित्य ठाकरेंवर टीका

बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वारस सांगता तुम्ही, ‘वाटाघाटी’ आणि ‘टक्केवारी’मुळे लोकहितासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेला मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेशा असल्याचा टोला पडळकर यांनी लगावला.