Sourav Ganguly | सौरव गांगुलींच्या टीमवर सचिव जय शहांची बॉलिंग पडली भारी, फक्त एका रनाने पराभव

कोलकाता : वृत्तसंस्था – BCCI ची सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडणार आहे. या बैठकीच्या आदल्या दिवशी इडन गार्डन्सवर (Eden Gardens) 15-15 ओव्हर्सची मॅच खेळवण्यात आली. शेवटपर्यंत रंगलेल्या या मॅचमध्ये बीसीसीआय अध्यक्षांच्या टीमचा जय शहा (Jay Shah) यांच्या कॅप्टनसीखालील सचिवांच्या टीमनी फक्त 1 रननं पराभव केला. बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कॅप्टन सौरव गांगुली (Sourav Ganguly) या मॅचमध्ये सहाव्या क्रमांकावर उतरले. त्यांनी 20 बॉलमध्ये 2 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 35 रन काढले. त्यानंतर त्यांना नियमाप्रमाणे रिटायर व्हावं लागलं. गांगुली (Sourav Ganguly) रिटायर झाल्याचा फटका त्यांच्या टीमला बसला.

कोलकाताचे इडन गार्डन्स हे सौरव गांगुली यांचे होम ग्राऊंड आहे. या ग्राउंडवर जय शहा यांनी स्पिन बॉलिंगने 7 ओव्हर्समध्ये 58 रन देत 3 विकेट्स घेतल्या. त्यांच्या बॉलिंगमुळेच शहा यांच्या टीमला 128 रनचा बचाव करता आला. जय शहा यांनी आपल्या स्पिन बॉलिंगच्या जोरावर टीम इंडियाचे माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीन (Former Team India captain Mohammad Azharuddin),गोवा क्रिकेट असोसिएशनचे सूरज लोटलिकर (Suraj Lotlikar of Goa Cricket Association),बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अविषेक दालमिया (Bengal Cricket Association President Avishek Dalmiya) यांची विकेट घेत गांगुलीच्या टीमला जोरदार धक्का दिला.

यानंतर सहाव्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या गांगुली (Sourav Ganguly) यांनी चांगली फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी 2 बॉलवर बाहेर येत ऑफ साईडला टोलेबाजी केली. त्याअगोदर बीसीसीआय सचिवांच्या टीमकडून अरुण धूमल (Arun Dhumal) आणि जयदेव शाह (Jaydev Shah) यांनी 92 रनची पार्टनरशिप करत 15 ओव्हर्समध्ये 3 बाद 128 रन केले. तर बीसीसीआयचे आताचे सचिव जय शहा 10 रन काढून नाबाद राहिले. या सामन्यात बीसीसीआय अध्यक्षांच्या टीमकडून गांगुली यांना 1 विकेट मिळाली.

Web Title : Sourav Ganguly | bcci agm festival match jay shah picks 3 wickets sourav ganguly teamfalls short by 1 run

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये