Sourav Ganguly | बीसीसीआयचे अध्यक्षपद जाणार असल्याने सौरव गांगुलीचा संताप, विरोधकांना दिला इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बीसीसीआयचे अध्यक्षपद (BCCI President) जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याने सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यातच आयसीसीचे (ICC) सुद्धा अध्यक्ष पद मिळणार नसल्याने गांगुली भडकले असून त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडताना गांगुली (Sourav Ganguly) यांना आयसीसीवर पाठवणार, असे ठरले होते. पण आता विरोधकांनी त्यांना आयसीसीवर पाठवणार नसल्याचे सांगितले.

अशाप्रकारे सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची कोंडी करण्यात आली असून त्यांना आयसीसीवर न पाठवता बीसीसीआयमधील एका छोट्या पदावर बोळवण केली जाणार आहे. मात्र गांगुली यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला आहे. आयसीसीवर पाठवले नसल्याचा राग त्यांच्या मनात धुमसत आहे.

गांगुली यांनी बीसीसीआयमध्ये जे घडले ते उघडपणे मांडतांना म्हटले की, मी 5 वर्षे बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष (Bengal Cricket Association) होतो. त्यानंतर आता बराच काळ बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले. काही गोष्टींमुळे मला हे पद सोडावे लागत आहे. पण प्रशासनामध्ये राहून खेळाडूंसाठी ज्या चांगल्या गोष्टी करता येतील, त्या मी नक्कीच केल्या. कारण मी एक खेळाडू होतो आणि त्यामुळे मला खेळाडूंना कोणत्या समस्या जाणवतात, हे माहिती होते.

गांगुली यांनी म्हटले. खेळाडूंच्या समस्या दूर करण्याचे काम मी केले. पण मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे.
इथे स्थावर असे काहीच नाही, सर्व गोष्टी या बदलत असतात. बीसीसीआयमध्ये ही तसेच आहे.
तुम्ही कायम बीसीसीआयमध्ये राहू शकत नाही. त्यामुळे इथे कोणीच परमनंट नाही, याचा सर्वांनीच विचार करायला हवा.

विरोधकांना धारेवर धरताना गांगुली म्हणाले, आता मी बीसीसीआय सोडून जात असलो तरी बीसीसीआय ही कोणाची
मालकी नाही किंवा बीसीसीआयमध्ये कोणीही परमनंट नाही. विरोधकांवर ही ही वेळ येईल.

Web Title :-  Sourav Ganguly | sourav ganguly threatens opponents before leaving bcci president know inside story

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Crime News | पती -पत्नीची गळा चिरुन हत्या; तालुक्यात प्रचंड खळबळ

Pune Crime | रिक्षाने प्रवास करताना ज्येष्ठ महिलेला मारहाण करुन लुबाडले; रिक्षाचालकाला अटक