‘हा’ खरा ‘SuperStar’ ; रिक्षाचालकांसाठी केलेल्या ‘त्या’ कामामुळे होतंय देशभर कौतुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तामिळ फिल्म इंडस्ट्रीतील मेगास्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय मक्कल उर्फ लाया थलापती दरवर्षी रिक्षाचालकांना जेवण देत असतो. सालाबादप्रमाणे यावर्षीही त्याने रिक्षाचालकांना जेवण दिले आहे. विजय दरवर्षी 1 मे रोजी म्हणजे कामगार दिनाच्या दिवशी रिक्षाचालकांना जेवण देत असतो. परंतु निवडणुकांमुळे या उपक्रमाला यावर्षी थोडा उशीर झाला.

रिक्षाचालकांच्या जेवणाचा जेवढाही खर्च होतो तो पूर्ण खर्च विजय एकटा करत असतो. शिवाय त्यांना जेवणासोबत भेटवस्तूही देत असतो. विजयचा सेक्रेटरी बस्सी आनंद यांनी ही भोजनाची जबाबदारी सांभाळली होती. त्याच्या उपक्रमामुळे तो ट्विटरवर ट्रेंडमध्येही होता.

विजयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच तो थलापती या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात विजय प्रमुख भूमिका साकारत असून त्याच्या बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे थलापती हा सिनेमा आहे. थलापती सिनेमाला ए आर रेहमान यांनी संगीत दिलं असून या सिनेमात विजय सोबत नयनतारा आणि जॅकी श्रॉफ देखील दिसणार आहेत.

अटली यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून कलपती यांनी या सिनेमाच्या प्रॉडक्शनची धुरा सांभाळली आहे. अटली आणि विजय यांनी आधीही एकत्र सिनेमे केले आहेत. मर्सल आणि सरकार अशी या सिनेमांची नावे आहेत. थलापती हा त्यांचा एकत्र काम करत असलेला तिसरा सिनेमा आहे.

https://twitter.com/VijayFansHere/status/1132323270231937024

https://twitter.com/Irshad_8055/status/1132549257913819136