रजनीकांत यांची मुलगी करते आहे दुसरं लग्न

चेन्नई : तामिळनाडू वृत्तसंस्था – दक्षिणेत अभिनयाच्या क्षेत्रात सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असणारा रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या दुसरे लग्न करते आहे. ती अभिनेता विशगन वंगामुडी यांच्याशी विवाहबंध होणार आहे. रजनीकांत यांच्या मुलीचा हा विवाह ११ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे संपन्न होणार आहे.

आपल्या लग्नाचे वृत्त हे सौंदर्या हिने सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहे. सौंदर्या हिने आपला एक फोटो सोशल मीडियात प्रदर्शित करून त्यावर आकर्षक कॅप्शन देखील लिहले आहे. आता लग्नाला केवळ एक आठवडा बाकी राहिला आहे. त्यापुढे सौंदर्याने #VedVishaganSoundarya असा हॅशटॅग देखील लिहिला आहे.

सौंदर्या यांच्या लग्नाचा विधी १० फेब्रुवारीला रोजी सुरु होणार आहेत. तसेच सौंदर्या हिचे ११ फेब्रुवारीला पारंपरिक पध्द्तीने लग्न होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १२ तारखेला सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरी वेडिंग रिसेप्शनची पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.

अभिनेता विशगन वंगामुडी यांचे हि हे दुसरे लग्न आहे. सौंदर्याचे पहिले लग्न अश्विन राम कुमार या बड्या व्यवसायांशी झाले होते. त्यांच्यात काही कारणावरून कलह झाल्यामुळे  त्यांनी २०१६ मध्ये एकमेकांपासून फारकत घेतली होती.