आजपासून लागोपाठ 5 दिवस मिळेल स्वस्त सोने, जाणून घ्या कसा घेऊ शकता फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला सुद्धा स्वस्तात सोने खरेदी करायचे असेल तर एक चांगली संधी आहे. सरकारची सॉवरेन गोल्ड स्कीम (Sovereign Gold Bond) पुन्हा एकदा गुंतवणुकदारांसाठी खुली झाली आहे. या स्कीममध्ये तुम्ही आजपासून म्हणजे 1 मार्च ते 5 मार्चपर्यंत गुंतवणूक करू शकता. गोल्ड बाँडसाठी यावेळी सरकारने इश्यू प्राईज 4,662 रुपये प्रति ग्रॅम म्हणजे 46,620 रुपये प्रति 10 ग्रॅम निश्चित केली आहे.

कुठून खरेदी करू शकता गोल्ड बाँड –
सॉवरेन गोल्ड बाँड खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे पॅनकार्ड असवणे आवश्यक आहे. हे बाँड ऑनलाइनसुद्धा खरेदी करू शकता. याशिवाय, बँका, स्टॉक होल्डिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसएचसीआयएल), निवडक पोस्ट ऑफिस आणि एनएसई व बीएसईसारख्या स्टॉक एक्सचेंजमधून याची खरेदी करू शकता.

किती खरेदी करू शकता गोल्ड ?
गोल्ड बाँड स्कीममध्ये गुंतवणूक करणारा व्यक्ती एका व्यवहारी वर्षात कमाल 500 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकतो. गुंतवणुकदार किमान 1 ग्रॅम आणि कमाल 4 किलो पर्यंतसाठी गुंतवणूक करू शकतो. हिंदू अविभाजित कुटुंबासाठी 4 किलो आणि ट्रस्ट इत्यादीसाठी 1 व्यवहाराच्या वर्षात कमाल 20 किलोपर्यंत गुंतवणुकीची परवानगी आहे.

सॉवरेन गोल्ड बाँड म्हणजे ?
गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकदाराला फिजिकल प्रकारे सोने मिळत नाही. हे फिजिकल गोल्डच्या तुलनेत खुप सुरक्षित असते. यावर तीन वर्षानंतर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. तर, याचा लोनसाठी वापर करू शकता. रिडेंप्शन बाबत बोलायचे तर पाच वर्षानंतर सुद्धा तुम्ही यातून बाहेर पडू शकता.

कशी ठरते प्राईज
सॉवरेन गोल्ड बाँडचे नवीन जारी मूल्य 4,662 रुपये प्रति ग्रॅम ठरवण्यात आले आहे. येथे दहा ग्रॅमची किंमत 46620 रुपये आहे. बाँडचे मूल्य इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिडेट (IBJA) द्वारे देण्यात आलेल्या 999 शुद्धतेच्या गोल्डच्या सरासरी क्लोजिंग प्राईजच्या आधारावर ठरलेले आहे. हे गोल्ड बाँड 8 वर्षासाठी जारी केले जातात आणि 5 वर्षानंतर यातून बाहेर पडण्याचा पर्याय सुद्धा असतो. अर्जदार किमान 1 ग्रॅम आणि त्याच्या मल्टीपलमध्ये खरेदी करू शकतो.