1 लाख 5 हजाराची लाच घेणारा विशेष लेखा परिक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – 1 लाख 5 हजाराची लाच घेताना विशेष लेखा परीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

रवींद्र वाघ असे अटक केलेल्या लेखा परीक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाघ हा सांगली येथील मध्यवर्ती कार्यालयात विशेष लेखा परीक्षक म्हणून कार्यरत आहे. वाळवा तालुक्यातील एका साखर कारखान्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.