मिरजेतील जुगारावर छापा  विशेष पथकाची कारवाई

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन  – मिरजेतील शास्त्री चौकात असणाऱ्या क्‍लासिक ऑनलाइन लॉटरी सेंटवर चालणाऱ्या कॉप्युटरवरील कॅसिनो जुगारावर छापा टाकण्यात आला. तेथून रोख रक्कमेसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष पथकाने ही कारवाई केली.

अधिक माहिती अशी,की अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी विशेष पथकास दिले आहेत. त्यानुसार सहायक निरीक्षक संतोष डोके यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. मिरजेतील शास्त्री चौकातील महादेव शेडगे याच्या क्‍लासिक ऑनलाइन लॉटरी सेंटरवर कॉप्युटरवरील कॅसिनो नावाचा जुगार चालत असल्याची माहिती पथकास मिळाली.

त्यानुसार छापा टाकण्यात आला. जुगार चालत असल्याने निदर्शनास आले. त्यानंतर कारवाई करण्यात आली. व्यवस्थापक हरिदास रामचंद्र साठे (20, रा. शास्त्री चौक), जुगार खेळणारे इम्रान अमिरुद्दीने सय्यद (34, वड्डी), गणेश राजू मद्रासी (19, शास्त्री चौक) यांना ताब्यात घेण्यात आले. तेथून जुगाराचे साहित्य, कॉप्युटर, मोबाइल, रोख रक्कम असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगारचा मालक महादेव शेडगे (रा. सांगली), दुकान गाळा मालक गुंडाभाऊ नांद्र (मिरज) हे दोघे पसार असून त्यांच्याविरोधात मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

श्री. डोके, मारुती मोरे, बजरंग शिरतोडे, दीपक ठोंबरे, मुदस्सर पाथरवट, अरूण पाटील, सचिन जाधव, सुहिल कार्तीयाने, ऋषिकेश सदामते, वनिता चव्हाण, प्रियांका धुमाळ, ज्योथी चव्हाण यांचा कारवाईत सहभाग होता.