PM मोदींच्या पाहुणचारासाठी अमेरिकेत स्पेशल शाकाहारी ‘नमो थाळी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी बहुचर्चित अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. आता मोदी टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात पोहोचले आहेत, तेथे ते हाउडी मोदी सोहळ्यास संबोधित करतील. अमेरिकेतील ४८ राज्यांमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांसह या सोहळ्यात ५० हजाराहून अधिक लोक उपस्थित असतील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे खासदार आणि महापौरही या समारंभाला हजेरी लावणार आहेत. परंतू हा सोहळा आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे. ते म्हणजे स्पेशल ‘नमो थाळी’.

या सोहळ्यातील आकर्षक बाब म्हणजे ह्यूस्टनमध्ये पंतप्रधान मोदींसाठी विशेष पदार्थ बनवले जात आहेत. पंतप्रधान मोदींसाठी खास ‘नमो थाली’ तयार केली गेली आहे. भारतीय वंशाच्या शेफ किरण वर्मा ह्युस्टनमध्ये पीएम मोदींसाठी न्याहारी, लंच आणि डिनर बनवतील. एका वृत्तसंस्थेशी खास संभाषणात कूक किरण यांनी हि माहिती दिली. किरण यांच्याकडून अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी प्रथमच डिश तयार केली जात आहे. पंतप्रधान मोदी शाकाहारी आहेत. त्यामुळे संपूर्ण डिश शाकाहारी बनवला जात आहे.

पंतप्रधान मोदींकडून कोणतीही विनंती नाही
किरण यांनी सांगितले की, नमो थाली पंतप्रधान मोदींना देण्यात येईल. ही प्लेट सामान्य लोकांसाठीही उपलब्ध असेल. ते म्हणाले की पंतप्रधान मोदींसाठी दररोज वेगवेगळ्या डिशेस बनवल्या जातील. त्यांच्या पाहुणचारासाठी वेगवेगळ्या राज्ये व शहरांतील प्रसिद्ध व्यंजने तयार केले जातील. तथापि, पंतप्रधान मोदींनी मात्र कोणत्याही विशिष्ट डिशसाठी विनंती पाठविली नव्हती.

हाउडी मोदी समारंभाला संबोधित करतील PM :
पीएम मोदी ह्युस्टन हाउडी मोदी कार्यक्रमास संबोधित करतील. अमेरिकेत, लोकशाही पद्धतीने निवडल्या गेलेल्या परदेशी नेत्यासाठी हाउडी समारंभ हा सर्वात मोठा कार्यक्रम असतो. पोपनंतर अमेरिकेत कोणत्याही परदेशी नेत्यासाठी हे सर्वात मोठे मेळावे असतात. टेक्सासमधील एक हजाराहून अधिक स्वयंसेवक आणि ६५० हून अधिक संस्थांच्या सहकार्याने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Visit :- policenama.com