SPPU Pune University | पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांची तारीख जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरु होणार परीक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे लांबवणीवर पडलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या दुसऱ्या सत्रातील परीक्षांची (Second Semester Exam) तारीख जाहीर केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) दुसऱ्या सत्राच्या परीक्षा 12 जुलैपासून सुरु होणार आहेत. ऑनलाईन आणि प्रॉक्टर्ड (Proctor) पद्धतीने या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. SPPU Pune University Six lakh students to appear for second semester exams

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

8 ते 10 जुलै दरम्यान सराव परीक्षा
कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. पुणे विद्यापीठाकडून पदविका (Deploma), पदवी (Degree), पदव्युत्तर पदवी (Post Graduation), प्रमाणपत्र (Certifications) आणि इतर अशा एकूण 284 अभ्यासक्रमांसाठी 4 हजार 195 विषयांसाठी ही ऑनलाईन परीक्षा (Online Exam) घेण्यात येणार आहे. मुख्य परीक्षेपूर्वी याही सत्रात 8 ते 10 जुलै दरम्यान विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (Mock Test) घेतली जाणार आहे. यामध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातील, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

अशी होणार परीक्षा
पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या या परीक्षा प्रॉक्टर्ड पद्धतीनं घेण्यात येणार आहेत. यामध्ये 60 प्रश्नांची ऑनलाइन परीक्षा असणार आहे. यातील 50 प्रश्नांची उत्तरं ग्राह्य धरली जातील. विज्ञान आणि अभियांत्रिकीच्या (Science And Engineering) गणित आणि संख्याशास्त्र या विषयासाठी 30 प्रश्न असणार आहेत. यामध्ये 25 प्रश्नांची उत्तरं ग्राह्य धरली जाणार आहेत. तसेच परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आले आहे.

ISRO Recruitment 2021 | इस्त्रोमध्ये विविध पदासांठी भरती, ‘या’ उमेदवारांसाठी मोठी संधी

विद्यार्थ्यांचा आवाज रेकॉर्ड करणार
ऑनलाईन परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करु नये यासाठी सत्र परीक्षेत प्रायोगिक तत्वावर काही विद्यार्थ्यांचा आवाज रेकॉर्ड (Voice Record) केला जाणार आहे. यामुळे परीक्षा अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल, असं परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.

विद्यार्थी तक्रार करु शकतात
लॉग इन न होणे, मध्येच लॉग आउट होणे, इंग्रजी किंवा मराठी माध्यम प्रश्नपत्रिका उपलब्ध न होणे,
आकृत्या न दिसणे, पेपर सबमिट न होणे, विद्यार्थ्यास परीक्षेच्या वेळी कोरोनाची बाधा झालेली असणे,
विद्यापीठ आयोजित परीक्षा किंवा अन्य सीए, सीईटी किंवा इतर परीक्षा एकाच दिवशी असणे,
अशी कारणं असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडे तक्रार करता येणार आहे.
परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांना त्या परीक्षेचं हॉल तिकीट दाखवणं बंधनकारक आहे.

या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप परीक्षेसाठी अर्ज केलेला नाही.
अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाने दिलासा दिला आहे.
अर्ज करु शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना 12, 13 आणि 14 जुलै दरम्यान अर्ज करता येईल.
अशा विद्यार्थ्यांची परीक्षा स्वतंत्ररित्या घेण्यात येईल.

Web Titel : SPPU Pune University Six lakh students to appear for second semester exams

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bhaskar Jadhav । ‘मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या, आजचा दिवस लोकशाहीला काळीमा फासणारा’