SPPU’S Vice-Chancellor | पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात; मुलाखतीचा आज शेवटचा दिवस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – SPPU’S Vice-Chancellor | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) कुलगुरूपदासाठी निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. (SPPU’S Vice-Chancellor) आज (दि.१९) मुलाखतीचा शेवटचा टप्पा पार पडणार असून, त्यानंतर काही दिवसांत कुलगुरू पदाचा निकाल जाहीर होणार आहे. कुलगुरू पदासाठी (Vice-Chancellor Post ) एकूण २७ अर्ज केलेल्या उमेद्वारांची मुलाखत गुरुवारी आणि शुक्रवारी पार पडणार आहे. यामधून पाच उमेदवारांची निवड केली जाईल व त्यांची नावे पुढे राज्यपालांकडे (Governor) पाठवली जातील. या पाच उमेदवारांची अंतिम मुलाखत (Interview) घेतल्यानंतर साधारणपणे मे महिना अखेरीस किंवा जून महिन्यात विद्यापीठाला नवीन कुलगुरू भेटण्याची शक्यता आहे. (SPPU’S Vice-Chancellor)

विद्यापीठाचे कुलगुरूपद हे एक महत्त्वाचे व जबाबदारीचे पद असल्यामुळे कुलगुरु निवडताना काही गोष्टी लक्षात घेतल्या जातात.
कुलगुरू पदासाठी अर्ज करण्यासाठी त्या व्यक्तीला प्राध्यापक (Professor) म्हणून दहा वर्षे काम केल्याचा अनुभव गरजेचा असतो.
कुलगुरू पदाच्या पात्रतेसाठी काही निकष लावले जातात, त्यामध्ये संबंधित उमेदवाराचा शैक्षणिक व प्रशासकीय अनुभव तपासला जातो.
उमेदवाराने आत्तापर्यंत कोठे काय काम केले आहे? हे पाहिले जाते. वेब ऑफ सायन्स (Web of Science) वरील व गुगल स्कॉलर साईटेशन (Google Scholar Citation), एच इंडेक्स (H Index), पब्लिकेशन्स (Publications) आदी माहिती सुद्धा बघितली जाते. उमेदवाराच्या नावे असणारे पेटेन्ट (Patent), विद्यापीठांच्या अधिकार मंडळावर केलेल्या कामाचा अनुभव, विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विशेष उपक्रम, रिसर्च प्रोजेक्ट (Research Project), उमेदवाराचा सोशल अवेअरनेस (Social Awareness) इत्यादी गोष्टी मुलाखती दरम्यान लक्षात घेतल्या जातात. या सर्व गोष्टींचा परिणाम कुलगुरू पदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान होतो.

पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीन करमळकर (Former Vice Chancellor Nitin Karamalkar)
यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेले कुलगुरू पद भरण्याबाबतची ही प्रक्रिया अनेक महिन्यांपासून सुरू आहे.
निवडणूकीसाठी शिफारस केलेल्या २७ उमेद्वारांपैकी ११ उमेदवार हे पुणे विद्यापीठात कार्यरत असून उर्वरित
उमेदवार इतर जिल्हातील आहेत. त्यामुळे विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यतील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला
(SPPU) पुण्यातीलच कुलगुरू मिळतील की इतर जिल्हातील मिळतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (SPPU’S Vice-Chancellor)

Web Title :  SPPU’S Vice-Chancellor | pune university vice-chancellor post interview in final

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाल्या-‘ फडणवीस यांनी शरद पवार यांना…’

Solapur Crime News | सीआयडीचे पथक अटकेसाठी आल्याचे समजल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक (Sr. PI), सहाय्यक निरीक्षकासह 7 पोलिस ‘फरार’

Maharashtra Politics News | ‘सुषमा अंधारेंचे काहीच चुकले नाही, पण बीडच्या जिल्हाध्यक्षांचे आरोप महत्त्वाचे’, भाजप आमदाराचे ठाकरेंवर गंभीर आरोप (व्हिडिओ)