NCP MP Supriya Sule | देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाल्या-‘ फडणवीस यांनी शरद पवार यांना…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुरुवारी पुण्यात भाजप (Pune BJP) प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधाला. शरद पवार (Sharad Pawar) यांचे ‘लोक माझे सांगाती’ (Lok Maze Sangati) या पुस्तकातील उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या 10 वाक्याचे जाहीर वाचन केले. फडणवीसांच्या या भाषणाची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जांभूळवाडी तलावाची पाहणी करण्यासाठी सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला

टीआरपी (TRP) कसा वाढवायचा हे शरद पवार यांच्याकडून शिकले पाहिजे असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस
यांनी लगावला होता. त्यावर सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी प्रत्युत्तर दिलं. फडणवीस यांनी शरद पवार यांना कॉम्प्लीमेंट दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकात पवारांनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या विधानांवर देखील प्रतिक्रिया दिली. लोक माझे सांगाती हे पुस्तक निट वाचा त्यात 100 गोष्टी चांगल्या आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल या पुस्तकात फक्त नोटस काढण्यात आल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

लोकसभेच्या (Lok Sabha Elections) जागावाटपावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी सावध भूमिका घेतली.
आम्ही 18 जागांवर लढणार असून, आमचे 18 खासदार लोकसभेत जातील असे संजय राऊत (Sanjay Raut)
यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं त्यांनी टाळलं.
मला राऊत काय बोलले किंवा समान जागा वाटपाबद्दल काहीही माहिती नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Web Title : NCP MP Supriya Sule | supriya sules reaction on lok sabha seat allocation in mahavikas aghadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | पुण्याच्या शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी ‘माझे पुणे, स्वच्छ पुणे’ मोहीम

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सिंहगड रोड पोलिस स्टेशन – भांडणे सोडविणार्‍या तरुणावर टोळक्याने कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न