Maharashtra Politics News | ‘सुषमा अंधारेंचे काहीच चुकले नाही, पण बीडच्या जिल्हाध्यक्षांचे आरोप महत्त्वाचे’, भाजप आमदाराचे ठाकरेंवर गंभीर आरोप (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | बीडमध्ये ठाकरे गटातील (Thackeray Group) दोन नेत्यांमध्ये तुफान राडा झाला. ठाकरे गटाचे स्थानिक नेते गणेश वरेकर (Ganesh Varekar) आणि जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव (Appa Jadhav) यांच्या वाद झाला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यासमोर (Maharashtra Politics News) हा वाद झाला. यावेळी आप्पा जाधव यांनी अंधारे यांना दोन चापट्या लगावल्या. याबाबतचा दावा स्वत: जाधव यांनी व्हिडिओ शेअर करत केला आहे. यावरुन भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी गंभीर आरोप केले आहेत. पद विकायला काढल्यावरुन सतत आरोप होत असतील तर ते गंभीर आहेत, असं नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटले.

नितेश राणे म्हणाले, सुषमा ताई आमच्या कितीही देवी देवतांवर बोलल्या, आमच्यावर कितीही आरोप केले तरी त्यांना झालेल्या मारहाणीचं आम्ही समर्थन करत नाही. मात्र, त्यांच्यावर झालेले आरोप आमच्या (Maharashtra Politics News) दृष्टीने महत्त्वाचे आहेत. जिल्हाप्रमुख पद विकायला काढलं होतं. ऑफिसच्या सोफा आणि एसीसाठी पैसे मागत होत्या. हे आरोप महाराष्ट्राने विचार करण्यासारखे आहे.

नारायण राणे (Narayan Rane) यांनी ज्यावेळी शिवसेना (Shivsena) सोडली त्यावेळी देखील हाच आरोप केला जात होता. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत असलेल्या आमदारांनीही तेच सागितलं की संघटनेतील पदे विकली जात आहेत. तिकिटे विकली जातात. आताही तोच आरोप केला जात आहे. वारंवार तेच आरोप होत असेल तर त्या आरोपांमध्ये तथ्य आहे, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

यात सुषमा अंधारेंची काही चूक नाही. सुषमा अंधारे यांच्याकडून काही अपेक्षाच नाहीय.
कारण जसा पक्ष प्रमुख तसे कार्य़कर्ते. त्यांनी जे केले ते कार्यकर्त्यांनी आत्मसात केलं आणि जगतायत.
स्वत:चा एक रुपयाचा इन्कम नसला तरी जे आलिशान आय़ुष्य जगतायत ते कोणामुळे? मातोश्री 2 वर एसी
कोणामुळे लागले आहेत. व्हिडिओकॉनचे (Videocon) मालक कुणाकडून खासदार होते.
यांची लाँड्री एका ठिकाणीच धुवायला जाते, कारण कामगार सेनेची सत्ता आहे.
गाड्यांचा मेन्टेनन्स पटेल नावाचा व्यक्ती करतो. परदेश दौरे असताना त्यांचा खर्च कोण करतो?
एक उद्योगपती त्यांच्या हॉटेल, जेवणाचे खर्च करतो. त्याच्या बिलासह आम्ही पुरावे देऊ शकतो.
असा पक्ष प्रमुख जर असेल तर पादाधिकाऱ्यांनी कशाला एसी आणि सोफ्यासाठी खिशातून पैसे काढायचे,
असा आरोप नितेश राणे यांनी केला.

सामनाचा साधा संपादक विमानाशिवय फिरत नाही. बाहेरच्या संपत्ती, अलिशान गाड्या कुठून घेतल्या.
संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचा आणि मालकाचा एक रुपयाचा इन्कम नाही.
महाराष्ट्राला दरोडेखोर म्हणून लुटतात. मग दुसऱ्यांवर काय आरोप करतात? असंही नितेश राणे यांनी म्हटले.

Web Title :  Maharashtra Politics News | ‘Sushma Andhare has done nothing wrong, but Beed’s district president’s allegations are important’, BJP MLA’s serious allegations against Thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाल्या-‘ फडणवीस यांनी शरद पवार यांना…’

Pune PMC News | पुण्याच्या शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी ‘माझे पुणे, स्वच्छ पुणे’ मोहीम

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सिंहगड रोड पोलिस स्टेशन – भांडणे सोडविणार्‍या तरुणावर टोळक्याने कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न