Sputnik Light | खुशखबर ! पुढील महिन्यात येतेय ‘सिंगल डोस स्पूतनिक लाईट’ व्हॅक्सीन, जाणून घ्या किती असेल किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sputnik Light | देशात बनत असलेली सिंगल डोसवाली (single-dose) ’स्पूतनिक लाईट’ (‘Sputnik Light’) व्हॅक्सीन सप्टेंबरमध्ये लाँच होऊ शकते (could be launched in September). कारण पनेसिया बायोटेक (Panesia Biotech) ने नुकतेच भारताच्या ड्रग रेग्युलेटर (Drug Regulators of India) समोर डॉजियर जमा केले आहे आणि व्हॅक्सीन (vaccine) च्या आपत्कालीन वापरासाठी मंजूरी (approval for emergency use) मागितली आहे.

 

रशियात अगोदरच परवानगी मिळाली

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, या व्हॅक्सीनची किंमत जवळपास 750 रुपये (cost around Rs 750) असेल आणि सुरुवातीला ती मर्यादित प्रमाणात उपलब्ध होईल. रशियात (Russia) अगोदरच या सिंगल डोस व्हॅक्सीनला परवानगी मिळालेली आहे. विश्लेषणात सांगितले आहे की ही व्हॅक्सीन 80 टक्के परिणामकारक (80 percent effective) आहे. पनेसिया आणि रशियन डायरेक्टर इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) मिळून या व्हॅक्सीनच्या निर्मितीचे काम केले आहे.

 

स्पूतनिक व्ही चा पुरवठा सुद्धा होईल वेगाने

अजूनपर्यंत दोन डोसवाल्या स्पूतनिकचा वापर केला जात होता. हैद्राबादमधील डॉ. रेड्डीज लॅबने ही व्हॅक्सीन भारतात आणली आहे. सूत्रांनुसार दोन डोसवाल्या स्पूतनिक व्ही ची कमतरता या महिन्याच्या अखेरपर्यंत समाप्त होऊ शकते. स्पूतनिक व्हीच्या फुल रोलआऊटवर प्रतिबंध लावला होता ज्यामुळे यामध्ये उशीर होत होता.

 

रशियात मिळेल मंजूरी

रशियाच्या गामालेया संस्थेद्वारे विकसित आणि आरडीआयएफ द्वारे समर्थित स्पुतनिक लाईटला मे महिन्यात रशियाने आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली होती. आरडीआयएफने आपल्या एका वक्तव्यात म्हटले होते की, रशियात केलेल्या चाचणीच्या विश्लेषणातील आकड्यांनुसार, स्पुतनिक लाईट जवळपास 80% प्रभावी आहे. तिसर्‍या लाटेचा धोका पाहता सिंगल डोसवाली ही व्हॅक्सीन देशासाठी खुप लाभदायक ठरू शकते.

 

दरवर्षी 10 कोटी डोस

पनेसिया बायोटेकने जुलैमध्ये घोषणा केली होती की, त्यांना स्पूतनिक व्ही व्हॅक्सीन बनवण्याचे लायसन्स
मिळाले आहे आणि हिमाचल प्रदेशच्या बद्दी प्लांटमध्ये बनवलेल्या व्हॅक्सीनने क्वालिटी चेकिंग पार केले आहे.
सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीने सुद्धा व्हॅक्सीनवर सहमती दिली आहे. पनेसिया दरवर्षी व्हॅक्सीनचे 10 कोटी डोस बनवणार आहे जे डॉ. रेड्डी (Dr. Reddy) भारतात देईल.

 

रशियन सुरक्षा डेटा जमा करण्यास परवानगी

आरोग्य मंत्रालयांतर्गत तज्ज्ञांच्या एका पॅनलने डॉ. रेड्डीजला भारतात व्हॅक्सीनला मंजूरीसाठी रशियन सुरक्षा
डेटा जमा करण्यास परवानगी दिली होती कारण स्पूतनिक लाईट स्पूतनिक व्ही चाच पहिला डोस आहे.

 

Web Title : sputnik light coiming in india in september single dose vaccine price sputnik ligh rollout next month

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Maharashtra Police | राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांना पुन्हा मुदतवाढ, कार्यरत पदांच्या 35 % होणार ‘ट्रान्सफर’

Twitter India चे हेड मनीष माहेश्वरी यांची बदली, अमेरिकेत केली नवीन नियुक्ती

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,686 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी