Twitter India चे हेड मनीष माहेश्वरी यांची बदली, अमेरिकेत केली नवीन नियुक्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Twitter India | ट्विटर इंडिया (Twitter India) चे हेड मनीष माहेश्वरी (Manish Maheshwari) यांची बदली करण्यात आली आहे. कंपनीने त्यांना आता अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये तैनात केले आहे. तिथे त्यांना कंपनीच्या रेव्हेन्यू स्ट्रॅटेजी आणि ऑपरेशन विभागात सिनियर डायरेक्टर बनवले आहे.


कंपनीसोबत कायम आहेत मनीष माहेश्वरी – ट्विटर

Twitter च्या जपान आणि आशिया पॅसिफिक एरियाचे व्हाईस प्रेसिडेंट Yu Sasamoto यांनी म्हटले की, मनीष माहेश्वरी अजूनही कंपनीसोबत कायम आहेत. त्यांना आता एका नवीन भूमिकेसाठी अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोला पाठवण्यात आले आहे. तिथे ते कंपनीत सिनियर डायरेक्टरची जबाबदारी सांभाळतील.

भाजपा नेत्यांसोबत झाला आहे वाद

ट्विटर (Twitter India) कंपनी मागील काही काळापासून वादात होती. कंपनीने टूलकिट प्रकरणात भाजपाच्या अनेक नेत्यांच्या ट्विटच्या पुढे ’मॅनिपुलेटिड’ चा टॅग लावला होता. यासोबतच देशाचे उपराष्ट्रपती वेंकैया नायडू (Venkaiah Naidu), कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांच्यासह अनेक नेत्यांचे ट्विटर हँडल लॉक केले होते. मात्र, सरकारच्या विरोधानंतर ही सर्व अकाऊंट सुरळीत करण्यात आली होती.

काँग्रेसने सुद्धा केला ट्विटरवर आरोप

हा वाद अजूनही सुरूच असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिल्ली रेप पीडितेच्या कुटुंबियांसोबत आपला फोटो ट्विट केला. ज्यानंतर भाजपा समर्थकांनी आपला राग व्यक्त केला. भाजपा समर्थकांच्या विरोधानंतर ट्विटरवर इंडियाने राहुल गांधी यांचे अकाऊंट लॉक केले. त्यांच्या या फोटोला रिट्विट केल्याने कंपनीने काँग्रेसच्या इतर अनेक नेत्यांची ट्विटर हँडलसुद्धा निलंबित केली. यानंतर काँग्रेस नेत्यांनी ट्विटर इंडियावर आपला संताप व्यक्त केला आहे.

 

Web Title : twitter india md manish maheshwari named in fir over distorted india map

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai High Court | उच्च न्यायालयाचा राज्यपालांना ‘झटका; विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या निर्णयाची करून दिली जाणीव

Pune Corporation | पाणी पुरवठा विभागातील 38 कोटी रुपयांच्या निविदांचा ‘घोळ’ ! महापौरांच्या आदेशानंतर महिन्याभराने संबधित अधिकार्‍याची ‘बदली’; चौकशीही धिम्या गतिने

Pune Corporation | पुणे महापालिकेचा ‘चमको’ कारभार ! शहरातील रस्त्यांवरील ‘खड्डे’ बुजविण्याकडे दुर्लक्ष; मात्र, एकाच रात्रीत मनपा भवनमधील रस्त्याचे डांबरीकरण