पर्यटकांना दिलासा ! ST महामंडळाची मुंबई-गोवा बससेवा आजपासून सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नाताळच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने (ST) मुंबई सेंट्रल-पणजी अशी शयन-आसनी बससेवा बुधवार (दि. 9) पासून सुरू केली आहे. यामुळे मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच सोय होणार आहे. या बसमध्ये आसन आणि शयन सीटची व्यवस्था आहे. त्यामुळे प्रवाशांनी आधीच बुकिंग केल्यास त्यांना आरक्षित सीट मिळू शकणार आहे.
मुंबईतून ही बस चिपळूण, कणकवली, सावंतवाडी, म्हापसा मार्गे पणजीला जाईल. मुंबई सेंट्रल येथून संध्याकाळी 4.30 वाजता तर पणजी येथून संध्याकाळी 4.00 वाजता बस सुटणार आहे. तसेच ही बस आगाऊ आरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच अ‍ॅपवरही उपलब्ध आहे. सदर बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे.

असे असेल तिकीट दर
मुंबई सेंट्रल- पणजी 965 रुपये
मुंबई सेंट्रल- म्हापसा 950
मुंबई सेंट्रल- बांदा 815,
मुंबई सेंट्रल- सावंतवाडी 875 ,
मुंबई सेंट्रल- कणकवली- 785