ST Workers Strike | एसटी महामंडळाचा कठोर इशारा ! 55 हजार संपकरी कामगारांना नोटीस; कंत्राटी चालकांच्या भरतीची तयारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ST Workers Strike | मागील अनेक दिवसांपासून राज्यभर एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरू आहे. राज्य सरकार आणि न्यायालयाच्या सुचनेनंतरही एसटी कामगारांनी आपला संप माघारी घेतला नाही. राज्य सरकारने (Maharashtra Government) सर्वच एसटी कामगारांना कामावर हजर राहण्याचे सांगितले होते. तरीही काही एसटी कांमगारांनी याला नकार देत आपला संप सुरूच ठेवला. यानंतर आता एसटी महामंडळाने (MSRTC) कठोर पावले उचलायला सुरुवात केलीय. एसटी महामंडळाने 55 हजार आंदोलकांना कारणे दाखवा नोटीस पाठवले आहे. तसेच, दुसरीकडे महामंडळ कंत्राटी तत्त्वावर नव्या चालकांची भरती करण्याच्याही तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

एसटी महामंडळाने (MSRTC) 55 हजार आंदोलकांना कारणे दाखवा नोटीस आणि कंत्राटी तत्त्वावर नव्या चालकांची भरती या दोन्हीवरुन कडक पावले उचलायला सुरूवात केल्याने यानंतर आता संपकरी एसटी कामगार (ST Workers Strike) काय भूमिका घेणार? हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, आतापर्यंत तब्बल 1144 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. तर, 11024 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची (Suspended) कारवाई केली गेली आहे.

मागील काही दिवसांपुर्वी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना (ST Workers) वेतन देखील वाढवून दिले होते.
परंतु महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर संपकरी कामगार ठाम असल्याने संप मागे घेण्यात आला नाही.
त्यानंतर अनेक कामगारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, तेव्हापासून प्रवाशांची उडालेली तारांबळ पाहता पुन्हा महामंडळाने वाहतूक सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे.
महामंडळाने सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालकांना पुन्हा सेवेत रुजू करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच याबाबत जाहिरातही प्रसिद्ध झालीय.
यानूसार वय 62 वर्ष पूर्ण होण्यासाठी किमान 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असणे गरजेचे असल्याचे महामंडळाने सांगितले.
कंत्राटी बेसवर नियुक्ती होणाऱ्या चालकांना प्रतिमहिना 26 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

 

त्याचबरोबर इच्छुक चालक ज्या विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत, त्या विभागांत करारपद्धतीच्या नेमणुकीसाठी अर्ज करु शकणार आहेत.
येत्या 3 दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन देखील एसटी महामंडळाकडून (MSRTC) करण्यात आले आहे.
दरम्यान, मंगळवारी औरंगाबाद येथील 172 कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवले आहे.
विलीनीकरणाची मागणी मान्य होत नसतील तर आम्हाला किमान स्वेच्छा मरणाची परवानगी देण्याची मागणी केली.
तर, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी आहे.

 

Web Title :- ST Workers Strike | st strike msrtc employees strike st sent notice to 55000 employees also hiring contract basis drivers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PAN-Aadhaar Card link | पॅन-आधार कार्डला लिंक न केल्यास 10000 रुपयांचा दंड भरावा लागेल ! ‘ही’ आहे शेवटची तारीख

 

Causes Of Dandruff | कोंडा होण्याची ही सर्वात मोठी कारणे, त्यांना टाळणे गरजेचे; जाणून घ्या

 

Control Overeating By Controlling Your Brain | ‘या’ पध्दतीनं मिळावा खाऊपणावर नियंत्रण, जाणून घ्या