१५० वर्षानंतर सेंट झेवियर्सला मिळणार पहिले मराठी प्राचार्य ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राजेंद्र शिंदे हे नाशिक जवळच्या ओढा या लहानश्या गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी मुंबई मध्ये आले. त्यांनी १९७८ साली सेंट स्टेनिसलॉसमध्ये शिक्षण सुरू केले, १९८३ मध्ये वनस्पती शास्त्रविषयातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आणि नंतर सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये रुजू झाले.
[amazon_link asins=’B077PVYCJW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eb967431-90bb-11e8-a4f4-f97ae9153a10′]

वेरूळचे रहिवाशी असणारे राजेंद्र शिंदे कॉलेजमध्ये गेली ३५ वर्षे शिकवण्याचे काम करत आहेत. त्यांनी १९८३ साली हर्बेरिअम क्युरेटर म्हणून नोकरी स्वीकारली. २०११ मध्ये ते कॉलेजचे उपप्राचार्य बनले. राजेंद्र शिंदे आपल्या नियुक्तीला सुखद आश्चर्य म्हणतात. ते म्हणाले, ‘कॉलेज व्यवस्थापनाने मला प्राचार्य म्हणून नामनिर्देशित करून एक स्ट्राँग मेसेज दिला आहे. माझी नियुक्ती माझ्या सहकाऱ्यांसाठी भविष्यात मार्गदर्शी ठरेल.’

मुंबई मधील असलेले सेंट झेवियर्स महाविद्यालयाला प्रथमच बिगरख्रिस्ती प्राचार्य मिळणार आहेत. महाविद्यालयामध्ये वनस्पती विज्ञान विभाग प्रमुख राजेंद्र शिंदे हे महाविद्यालयाचे २४ वे प्राचार्य म्हणून १ सप्टेंबरपासून पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बिगर ख्रिस्ती प्राचार्याची नेमणूक करणारे सेंट झेवियर्स हे भारतातले एकमेव ख्रिश्चन कॉलेज ठरणार आहे. शिंदे यांच्या रुपाने एक मराठी प्राचार्यही संस्थेला लाभणार आहेत.