‘स्टार्च हवंय विचारांना’ काव्यसंग्रह प्रकाशना प्रसंगीं वक्तृत्व शैलीतून मराठी भाषेचे महत्व दिले पटवून

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – काव्य संमेलन म्हटले की कवीना आपल्या काव्य तुन जनजागृती, विचार मांडून आपल्या कवितेच्या माध्यमातून संकल्पना मांडून काव्य प्रेमींना सुखद आनंद देऊन आपल्या काव्य रुपी विचारणा चालना देतात दि.१८ जानेवारी पुणे येथे कवयित्री प्रतिभा मगर यांनी लिहिलेल्या स्टार्च हवाय विचारांना या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राज्य मराठी भाषा समितीचे अध्यक्ष तथा आमदार चेतन तुपे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उस्मानाबाद नगरपालिकेचे बांधकाम सभापती तथा साहित्यिक युवराज नळे, कोकण विभाग पत्रकार संघाचे मुंबई जिल्हा विभागीय अध्यक्ष तसेच को वि प संघ- साहित्य विभाग अध्यक्ष रवींद्र यशवंतराव (देशमुख), ज्येष्ठ कवी उद्धव कानडे, राष्ट्रपती पदक विजेते त्र्यंबक लोकरे, माजी महापौर वैशालीताई बनकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे, शिवाजी मगर उपस्थित होते.

कार्यक्रमात राज्य मराठी भाषा समितीचे अध्यक्ष तथा सन्माननीय आमदार चेतनदादा तुपे यांनी आपल्या खास वक्तृत्व शैलीतून मराठी भाषेचे महत्व पटवून दिले तसेच कोकण विभाग पत्रकार संघाच्या साहित्य विभागाचे कौतुकही केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन कवयित्री प्रतिभा मगर यांनी केले. कार्यक्रमाला विभागीय माहिती अधिकारी राजेंद्र सरग, सेवानिवृत्त सेल टॅक्स कमिशनर अशोक जाधव, राजेंद्र काळभोर, शिक्षण सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ, सुमन लोखरे ,प्रसाद मगर , पृथ्वीराज मगर , संध्या मगर यांच्यासह अनेक साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.