घर बसल्या 10 हजार लावून सुरु करा ‘हा’ बिझनेस; दर महिन्याला होईल 30 हजारांची कमाई

नवी दिल्ली: लोणचे प्रत्येक जेवणाला चव देणारा पदार्थ आहे. ताटात लोणच्याशिवाय जेवण पूर्ण वाटत नाही. त्याचबरोबर हा एक असा बिझनेस आहे जो प्रत्येक ऋतूत चालू शकतो. जर तुम्ही एखादा नवा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर लोणच्याचा व्यवसाय हा नफा मिळवून देणारा बिझनेस आहे. लोणचे तयार करण्याच्या बिझनेसची सुरवात घरापासून होऊ शकते. जेव्हा तुमचा बिझनेस वाढू लागेल तेव्हा तुम्ही वेगळी जागा घेऊन या व्यवसायाला पुढे घेऊन जाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया की कशाप्रकारे तुम्ही या बिझनेसला पुढे घेऊन जाण्याचा विचार करू शकता आणि यातून किती कमाई होऊ शकते.

१० हजारांत सुरु करा हा बिझनेस
तुम्हीही लोणचे बनवण्याचा व्यवसाय घरी सुरु करू शकता. हा व्यवसाय फक्त १० हजारांत सुरु केला जाऊ शकतो. यातून तुम्हाला २० ते ३० हजारापर्यंत कमाई होऊ शकते. ही कमाई तुमच्या वस्तूंची मागणी, पैकींग आणि ठिकाण यावर अवलंबून असेल. लोणच्याला तुम्ही ऑनलाईन, घाऊक, किरकोळ साखळ्यांना विकू शकता.

९०० स्वेअरफूटची जागा आवश्यक
लोणचे तयार करण्याच्या व्यवसायात ९०० स्वेअरफूटच्या जागेची आवश्यकता लागेल. लोणचे तयार करणे, लोणचे सुखवणे, लोणचे पॅकिंग करणे यासाठी मोकळ्या जागेची गरज आहे. लोणच्याला जास्त वेळेपर्यंत टिकवण्यासाठी लोणचे बनविताना अगदी स्वच्छ साफसफाईची आवश्यकता असते. तरच लोणचे अधिक दिवस अखंड राहील.

लोणचे बनवण्याच्या व्यवसायात तुम्ही इतके पैसे कमवू शकता
दहा हजार रुपये खर्च करून तुम्ही दुप्पट पैसे कमवू शकता. पहिल्या विपणनात खर्चाची संपूर्ण रक्कम परत मिळविली जाते आणि त्यानंतर केवळ नफा होतो. हा छोटासा व्यवसाय कठोर परिश्रम आणि नवीन नवकल्पनांच्या माध्यमातून मोठा व्यवसाय बनविला जाऊ शकतो. या व्यवसायाचा नफा दरमहा प्राप्त होईल आणि नफ्यातील वाढ होईल.

पिकल मेकिंग बिझनेस लायसन्स कसे मिळेल
लोणचे बनवण्याच्या व्यवसायासाठी परवाना आवश्यक असतो. व्यवसाय सुरु करण्यासाठी खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण कडून परवाना मिळविला जाऊ शकतो. या परवान्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरून अर्ज करता येतो.