State Bank of India | खुशखबर ! ‘या’ बँक ग्राहकांना घरबसल्या मिळणार 20 हजार रूपयांपर्यंत कॅश, जाणून घ्या काय आहे ही सर्व्हिस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  State Bank of India | भारतातील सर्वात मोठी असणारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) आणखी एक नवी सुविधा जारी केली आहे. या बँकेचा ग्राहक असणा-यासाठी एक खूशखबर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी अनेक वेगवेगळ्या सुविधा आणत असते. कोरोना कालावधीत बँकेने ग्राहकांसाठी घरपोच बँकिंग सुविधाही (SBI Doorstep Banking) सुरू केली. यात पैसे काढण्यापासून ते पे ऑर्डरपर्यंत, नवीन चेकबुक, नवीन चेकबुक रिक्विझेशन स्लिप तुम्हाला विविध प्रकारच्या सुविधा देत आहे. बँकेच्या या घरपोच सेवेमधून पैसे काढण्याची किमान मर्यादा 1000 रुपये आहे आणि कमाल मर्यादा 20,000 रुपये आहे. या नव्या सुविधेमुळे ग्राहकांचा फायद्याबरोबरच वेळही वाचणार आहे.

 

 

या बँकिंग सेवेचा (Banking services) लाभ घेण्यासाठी ग्राहकाला आधी नोंदणी करावी लागेल. https://bank.sbi/dsb या अधिकृत लिंकवर क्लिक करून नोंदणी करू शकणार आहेत. दरम्यान, ही सुविधा जॉइंट अकाउंट, मायनर अकाउंट तसेच वैयक्तिक नसलेल्या खातेधारकांना (State Bank of India) दिली जाणार नाही. तर, ज्या ग्राहकांचा नोंदणीकृत पत्ता गृह शाखेच्या पाच किमीच्या परिघात आहे, त्यांनाच ही सुविधा मिळणार आहे.

 

 

या क्रमांकावर संपर्क साधा –

 

बँकेच्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशन (Mobile application), वेबसाइट अथवा कॉल सेंटरच्या माध्यमातून डोअरस्टेप बँकिंग (Doorstep Banking) सेवेसाठी नोंदणी करता येते. याशिवाय 1800111103 या टोल फ्री क्रमांकावर सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत कॉल करता येईल. एसबीआय डोअरस्टेप बँकिंग सेवांबद्दल अधिक माहितीसाठी, ग्राहक https://bank.sbi/dsb ला भेट देऊ शकतात.

 

 

डोअरस्टेप बँकिंग

 

  • यासाठी नोंदणी होम ब्रँचमध्ये करावी लागेल.
  •  जोपर्यंत ही सुविधा संपर्क केंद्रावर पूर्ण होत नाही, तोपर्यंत होम ब्रँचमध्येच अर्ज करावा लागेल.
  • पैसे जमा करणे आणि काढणे या दोन्हीसाठी कमाल मर्यादा 20 हजार रुपये प्रतिदिन आहे.
  • सर्व गैरआर्थिक व्यवहारासाठी सेवा शुल्क 60 + GST आहे.
  • तर आर्थिक व्यवहारासाठी ते 100 + GST आहे.
  • पैसे काढण्यासाठी, चेक आणि पैसे काढण्याच्या फॉर्मसह, पासबुक देखील आवश्यक असेल. (State Bank of India)

 

 

Web Title : State Bank of India | sbi doorstep banking sbi provide 20000 cash at your home know about this service

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

7th Pay Commission | खुशखबर ! मोदी सरकारकडून सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त मोठं गिफ्ट; DA 3% नी वाढवला

Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिकाला 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या आणखी एकाला गुन्हे शाखेकडून अटक

Nagpur Crime | नागपुरमध्ये 4 मित्रांनी फिल्मी स्टाईलने केला जिवलग मित्राचा ‘गेम’