छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ‘या’ भव्य पुतळ्याप्रमाणे उभारणार 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवस्मारकाबाबत होणारं राजकारण काही थांबता थांबेना. आधी शिवस्मारकाचा पुतळा अश्वारुढ असणार अशी जाहिरातबाजी केल्यानंतर आता मात्र शिवाजी महाराजांचा उभा पुतळा उभारण्याबाबत तांत्रिक समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्रातून हि माहिती समोर आली आहे. २७ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

शिवस्मारकाचे काम सुरु होऊन चार महिन्यांचा कालावधी झाल्यानंतर आता राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुतळ्याच्या खर्चाची वर्गवारी करण्यात येणार आहे. त्यानुसार, नुकताच सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा गुजरात मध्ये उभारण्यात आला असून तसाच भव्य दिव्य पुतळा शूर शिवाजी महाराजांचा साकारायचा विचार सध्या सुरु आहे.

२००५ पासून प्रलंबित असलेला शिवस्मारक हा प्रश्न याबाबत आता कुठे भाजप सरकार गांभीर्याने विचार करत आहे, परंतु आजही पुतळ्याबाबत अंतिम  निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पुतळा नक्की कसा असावा याबाबत तीन-चार पर्याय सादर करण्यात यावेत असे आदेश या समिचीच्या अध्यक्षांनी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांना दिले आहेत. या बैठकीतील इतिवृत्तात याबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव मनोज सौनिक हे तांत्रिक समितीचे अध्यक्ष आहेत. मात्र, सौनिक यांनी या नव्या बदलाबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

या चार मॉडेल पैकी असणार पुतळा

सुत्रांच्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये झालेल्या या बैठकीनंतर पुतळ्याचे चार मॉडेल तांत्रिक समितीसमोर सादर करण्यात आली आहेत. यांपैकी एक पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर बसवलेल्या पुतळ्याप्रमाणे आहे. तसेच दुसरा पर्याय हा गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याप्रमाणे उभ्या पुतळ्याचा आहे. तर उरलेल्या तीन पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्यांचे पर्याय देण्यात आले आहेत, यामध्ये घोड्याच्या पायांच्या रचनेत काहीसे बदल सुचवण्यात आले आहेत.

Loading...
You might also like