पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांच्या बदलीला स्थगिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गृह विभागाने २७ जुलै रोजी राज्यातील पोलीस दलातील पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये परिमंडळ-४चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंडे यांची धुळे येथे पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली होती. आज (सोमवार) गृह विभागाने राज्यातील पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश काढले असून पोलीस उपायुक्त प्रविण मुंडे यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे ही गृह विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच वाशिमचे अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांची पुणे पोलीस दलामध्ये पोलीस उपायुकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

आज बदली झालेल्या अधीकाऱ्याचे नाव आणि कंसामध्ये कोठून कोठे बदली झाली ते पुढील प्रमाणे…
[amazon_link asins=’B075Q8V532′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2a7021e3-9982-11e8-8dda-bd6457f52561′]
सी.के. मिना (पोलीस उपायुक्त औरंगाबाद शहर (बदली आदेशाधीन) ते पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, औरंगाबाद), निर्मला देवी (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर (बदली आदेशाधीन) ते पोलीस उप आयुक्त नगपूर शहर), निसार तांबोळी (पोलीस अधीक्षक, वर्धा (बदली आदेशाधीन) ते उप आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई), बसवराज तेली (पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे (बदली आदेशधीन) ते पोलीस अधिक्षक, वर्धा), निकेश खाटमोडे (पोलीस उप आयुक्त मुंबई शहर (बदली आदेशाधीन) ते पोलीस उप आयुक्त, औरंगाबाद शहर), सुनिल भारद्वाज (प्राचार्य़, पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला (बदली आदेशाधीन) ते सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई), प्रशांत कदम (अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण ते पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर), संजय सुरगौडा पाटील (अपर पोलीस अधीक्षक, हिंगोली (बदली आदेशाधीन) ते अपर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण), लता फड (अपर पोलीस अधीक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक (बदली आदेशाधीन) ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद), डी.के. साकोरे (उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई (बदली आदेशाधीन) ते पोलीस अधिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), स्वप्ना गोरे (अपर पोलीस अधिक्षक, वाशिम ते पोलीस उप आयुक्त, पुणे शहर), पंकज डहाणे (पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग नवी मुंबई (बदली आदेशाधीन) ते पोलीस उप आयुक्त, नवी मुंबई), विश्वास पांढऱे (पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई ते पोलीस अधिक्षक, धुळे)

Deputy Commissioner of Police Dr.  Pravin Munde