‘WhatsApp’ ला फिंगरप्रिंटनं ‘असं’ करा ‘लॉक’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल प्रत्येक जण आपल्या फोन ला लॉक करत असतो. सुरक्षेच्या कारणावरून आता अ‍ॅपला सुद्धा लॉक करून ठेवण्याची तरुणाईला सवय लागली आहे. त्यासाठी अ‍ॅप लॉक सारखे अनेक अ‍ॅप वापरले जातात. मात्र आता दुसऱ्या कोणत्याही अ‍ॅपशिवाय तुम्ही फिंगरप्रिंट लॉक व्हाट्सअ‍ॅपला लावू शकता.

अशाप्रकारे लावा फिंगरप्रिंट लॉक –

१ प्ले स्टोअरमध्ये ‘व्हाट्सअ‍ॅप’ सर्च करा. व्हाट्सअ‍ॅपचा ऑप्शन आल्यावर खाली स्क्रोल केल्यावर ‘बीकम अ बेटा टेस्टर’ नावाचा ऑप्शन दिसेल. त्यावर जाऊन ‘आय एम इन’वर क्लिक करा.

२ त्यानंतर व्हाट्सअ‍ॅपवर जाऊन वर दिसणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा. तिथे खाली एक मेन्यू दिसेल आणि अनेक ऑप्शन्स दिसतील. त्यापैकी सेटिंग्सवर क्लिक करा

३ सेटिंग्जमध्ये गेल्यावर तिथेही अनेक ऑप्शन्स दिसतील. प्रोफाइल फोटोच्या खाली दिसणाऱ्या अनेक ऑप्शन्स पैकी अकाउंटवर क्लिक करा.

४. अकाउंटमध्ये गेल्यावर प्रायव्हसी सेटिंग्सचा ऑप्शन सिलेक्ट करा. प्रायव्हसी सेटिंग्समध्ये गेल्यावर सर्वात खाली फिंगरप्रिंट लॉकचा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करा.

५. फिंगरप्रिंट ऑप्शनवर टॅप करा आणि नंतर ‘अनलॉक विथ फिंगरप्रिंट सेन्सर’ नावाचा ऑप्शन येईल. तेथील टॉगलला ऑन करा. असं करताच व्हाट्सअ‍ॅप हे कन्फर्म करायला सांगेल. कन्फर्म केल्यावर लॉक करण्याची वेळ १ मिनिट ते ३० मिनिटं निवडू शकता.

आतापर्यंतच्या व्हाट्सअ‍ॅप मधील हे सर्वात क्रेझी फीचर आहे आणि तरुणाईची लॉकिंगची गरज लक्षात घेता हे फिचर काढले असावे.

आरोग्यविषयक वृत्त –