पुण्यात चितळेंकडून दूध संकलन बंद 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध बंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज दूध  संकलन करणे बंद केले आहे. शहरात आज दुधाचा पुरवठा सुरळीत झाला असला तरी दूधसंकलन बंद करण्यात आले असल्यामुळे उद्या मात्र पुणेकरांना दुधाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0b23dd43-89ac-11e8-9836-797768396711′]

पुण्यातील प्रसिद्ध चितळे दूध डेअरी चे गिरीश चितळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात पुकारण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चितळे मार्फत आज दूध संकलन करणे बंद केले आहे.  दूध संकलन करण्यासंदर्भात आज सांयकाळपर्यंत निर्णय घेण्यात येईल. पुणे आणि आसपासच्या भागात चितळे चे दूध मोठ्या प्रमाणात वितरीत होते. दूध संकल बंद करण्यात आल्यामुळे दुधाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यातील दूध उत्पादक शेतकयांच्या खात्यात प्रति लिटर पाच रुपये थेट जमा करण्यात यावे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली असून त्या पार्श्वभूमीवर काल पुण्यातील दगडूशेठ गणपतीला दुधाचा अभिषेक खासदार राजू शेट्टी यांनी करून आंदोलनाची सुरुवात केली. तर या आंदोलनाचे पडसाद राज्यभरात मोठ्या प्रमाणावर उमटले आहेत. याआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी भाजप सरकारला अधिवेशनात चांगले धारेवर धरले असून अद्याप  कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे राज्यात येत्या काळात नागरिकांना दूध टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधूने दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
[amazon_link asins=’B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’148e4bdd-89ac-11e8-a03c-1faba0be5889′]

विधानसभेत पडसाद

स्वाभिमानीच्या दूध बंद आंदोलनाचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेतला. “राज्यातील शेतकरी दुधासाठी आंदोलन करीत आहेत पण सरकार ठोस पावले उचलत नाही. हे सरकार काय रिलायन्स आणि पतंजली कडून दूध पुरवठा होण्याची वाट पाहताय का? असा सवाल धनंजय मुंढे यांनी केला. दूध बंद आंदोलनाबाबत दिल्ली येथे बैठक घेण्यात येईल अशी चिन्हे दिसत आहे.