उरुळी देवाची व फुरसुंगी ग्रामस्थांचे कचरा आंदोलन मागे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांनी तेथील कचरा डेपोमध्ये ओपन डंपिंग करण्यास कालपासून विरोध केला होता. त्या ठिकाणी एक गाडी जाऊ न दिल्याने शहराच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला. या प्रश्नावर आज ग्रामस्थ आणि प्रशासनामध्ये झालेल्या बैठकीत ग्रामस्थांच्या काही अटी मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B014PHNRE4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3029d346-9644-11e8-84ae-73fd4542a27e’]

कचरा डेपोमुळे बाधितांच्या वारसांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा निर्णय महिन्याभरात घेण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

पुणे महापालिकेकडून फुरसुंगी गावातील कचरा डेपोमध्ये केले जाणारे कचऱ्याचे ओपन डंपिंग 1 ऑगस्टपासून तेथील ग्रामस्थांनी काल पासून बंद केले होते. त्यामुळे शहरात हजारो टन कचरा तसाच पडून होता. नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता झाल्याने कालपासून प्रशासन आणि नगरसेवकामध्ये देखील बैठक झाली. तर उरुळी देवाची आणि फुरसुंगीचे ग्रामस्थ शंकर हरपळे यांच्या समावेत काही कार्यकर्ते आज पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांच्यात बैठक झाली.

सीसी रोड, जलशुद्धीकरण केंद्र,पाण्याच्या टाक्या आणि विविध विकास कामे करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक उपस्थित होते.

उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थानी आंदोलन मागे घेतल्याने पुणेकर नागरिकांची कचरा कोंडीतून सुटका झाल्याचे स्पष्ट झाले आहे.