माजी क्रिकेटर इरफान पठाणला ट्विटरवर मिळाली ‘खुशखबर’, चाहत्यांचे मानले आभार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी क्रिकेटर आणि ऑलराउंडर इरफान पठाणचे ट्विटरवर पाच मिलियन फॅन्स फॉलोईंग झाले आहे. यामुळे आनंदीत होऊन त्याने ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले की, 5 मिलियन श्रीमंत बनवल्या बद्दल धन्यवाद. मागच्या वर्षीसुद्ध जेव्हा इरफान पठाणचे फॅन फॉलोईंग फेसबुकवर 5 मिलियन झाले होते तेव्हा त्याने फॅन्ससाठी व्हिडिओ मेसेज केला होता आणि त्यांचे आभार मानले होते.

याच वर्षी जानेवारीमध्ये क्रिकेटमधून संन्यास घेणार्‍या इरफान पठाणने कोरोना व्हायरसमुळे रद्द झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये भाग घेतला होता. त्याने भारत लीजेंड्सकडून खेळताना श्रीलंका लीजेंड्सविरूद्ध मॅच जिंकून देणारी कामगिरी केली. या मॅचमध्ये त्याने 31 चेंडूत 57 धावा केल्या. यामध्ये 6 चौकार आणि 3 षटकार मारले होते.

त्याच्या इंटरनॅशनल क्रिकेट करियरबाबत बोलायचे तर इरफान पठाणने टीम इंडियासाठी 29 टेस्ट, 120 वनडे आणि 24 टी 20 स्पर्धा खेळल्या आहेत. त्याने 29 टेस्ट मॅचमध्ये 100 विकेट घेतल्या आहेत आणि एका सामन्यात त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी 59 रण देऊन 7 विकेटची आहे. एका टेस्टमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी 126 रण देऊन 12 विकेटची आहे. 120 वनडे मॅचमध्ये त्याने 173 विकेट घेतल्या आहेत आणि त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी 27 रण देऊन 5 विकेटची आहे. तर 24 टी 20 अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने एकुण 28 विकेट घेतल्या आणि त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी 16 रण देऊन 3 विकेटची आहे.