‘डोकेदुखी’पासून ते ‘सुस्तपणा’पर्यंत आराम देतात ‘हे’ चष्मे, जाणून घ्या काय आहे त्यांची ‘गुणवत्ता’ आणि ‘किंमत’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जेव्हा जवळ किंवा लांबची नजर कमजोर पडते तेव्हा डोळ्यांवर चष्मा चढणे ही सामान्य बाब आहे. परंतु ब्रिटन आणि अमेरिकेसह बर्‍याच देशांमधील कंपन्यांनी मायग्रेनच्या वेदना कमी करण्यासाठी तसेच सुस्तपणा आणि थकवा यांच्या तक्रारीपासून मुक्त होण्यासाठी प्रभावी असे चष्मे सादर केले आहेत. एक चष्मा तर असा आहे ज्यात दृष्टिहिनांच्या डोळ्यांसमोर असलेली दृश्ये सांगण्याची क्षमता आहे. यासारख्या काही हायटेक चष्म्यांच्या गुणवत्तेबाबत जाणून घेऊया.

1. एयो लाइट थेरपी ग्लासेज

– एलईडी लाइटने सुसज्ज असा हा चष्मा डोळ्यांत निळ्या प्रकाशाचा प्रवाह वाढवतो.
– सुस्तपणा, थकवा दूर करून शरीरात नवीन उर्जा संक्रमित करण्यात प्रभावी.
– बॉडी क्लॉकला नियंत्रित करून निद्रानाशच्या तक्रारीपासून मुक्त करतो.
– किंमत: 19000 रुपये

2. अ‍ॅबलोपिक्स इलेक्ट्रॉनिक शटर ग्लासेज

– या चष्म्यामध्ये इलेक्ट्रॉनिक शटर लावण्यात आले आहे, जो प्रत्येक पाच सेकंदात मजबूत प्रकाश असलेल्या डोळ्याच्या पुढील दृश्याला कव्हर करतो.
– परिणामी मेंदू कमकुवत प्रकाश असलेल्या डोळ्यांमधून जास्त काम करण्यास सुरवात करतो, यामुळे हळू हळू या डोळ्याचा प्रकाशामध्ये सुधारणा होत जाते.
– किंमत: 25800 रुपये

3. व्हिस्टा मेश क्लिप-ऑन ग्लासेज

– दोन्ही लेन्सच्या मध्यभागी मेश फिल्टर लावण्यात आलेले आहे, ज्यामुळे डोळ्यांवर जास्त जोर पडत नाही.
– प्रकाशापासून होणाऱ्या त्रासाला देखील दूर करतो, मायग्रेनच्या वेदना कमी करण्यास देखील मदत करतो.
– किंमत: 7400 रुपये

4. ब्लेफास्टीम गॉगल्स

– हा चष्मा विशेष रिंगने सुसज्ज आहे, ज्यामध्ये मिनरल वॉटर किंवा खारट द्रावण भरलेले असते.
– ऑन केल्यावर रिंगमध्ये वाष्प बनतो, ज्यामुळे डोळ्यांमधील पेशींना ओलावा मिळतो.
– पेशी खराब होण्याचा आणि प्रकाश कमकुवत होण्याचा धोका कमी होतो, दिवसातून दोनदा दहा मिनिटे वापरणे फायदेशीर आहे.
– किंमत: 20000 रुपये

5. होलोरास पिनहोल ग्लासेज

– या चष्माच्या दोन्ही लेन्समध्ये बारीक छिद्रयुक्त थर लावण्यात आली आहेत, जे अप्रत्यक्ष प्रकाशात अडथळा आणतात.
– व्यक्ती आणि वस्तू अधिक स्पष्ट दिसतात, उत्पादक डोळ्याचा प्रकाश वाढविण्यास प्रभावी असल्याचा दावा करतात.
– किंमत: 800 रुपये

6. ऑरकॅम माय आय

– या चष्म्याच्या दांडीवर पेनच्या आकाराचे विशेष डिव्हाइस स्थापित केले गेले आहे.
– डिव्हाइसमध्ये उपस्थित कॅमेरा प्रिंटेड आणि डिजिटल अक्षर वाचण्यात सक्षम.
– इअरफोनद्वारे संबंधित शब्द किंवा वाक्याला धारकाच्या कानाजवळ पोहोचवतो.
– किंमत: 420000 रुपये