बंद शव पेटीमध्ये 10 फूट खोल खड्यात युट्युबरला पुरले; 50 तासानंतर पुन्हा जिवंत बाहेर निघाला, पहा VIDEO

पोलीसनामा ऑनलाइन टीम :  प्रसिद्ध युट्युबर मिस्टरबीट यांनी एका शवपेटीत ५० तास घालविले आहेत. सुमारे १० फूट खोल त्यांनी २ दिवसांपेक्षा जास्त काळ घालविला आहे असे असूनही ते जिवंत बाहेर आले. इतकेच नाही तर त्यांनी आपल्या बऱ्याच कॅमेरांच्या मदतीने हा क्षण टिपला आहे. त्यांचे युट्युबवर मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

त्यांचा हा १२ मिनिटांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये बीट शवपेटीमध्ये झोपलेल्या अवस्थेत दिसत आहेत. या दरम्यान ते डिव्हाइसवर बाहेरील मित्रांसह बोलताना दिसत आहेत.

यावेळी ते म्हणाले की मला चारी दिशेला फिरायचे आहे परंतू मी असे करू शकत नाही. मिस्टरबीटच्या शवपेटीत एक ब्लॅंकेट, काही खाद्यपदार्थ आणि एक उशी होती. या रविवारी युट्युबवर व्हिडीओ शेअर करत ते म्हणाले की , ”ही आतापर्यंतची सर्वांत क्रेझी गोष्ट आहे.”