इंदापूर तालुक्यातील भरणेवाडीत तरूणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ

वालचंदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  इंदापूर (Indapur) तालुक्यातील भरणेवाडी एका तरुणाने सणसरजवळील 39 फाटा येथील मित्राच्या घराजवळ गळफास घेतल्याची घटना घडली. तरुणाचा मृतदेह (Body) गळफास (hanging) घेतलेल्या अवस्थेत आढळून आला असताना पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात मयत (Accident Death) म्हणून केली आहे. तर नातेवाईक व कुटुंबातील नागरिकांनी संशयास्पद मृत्यू असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आप्पाराव भरणे (वय-40) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे आहे. आप्पा भरणे व सणसर जवळील 39 फाट्याजवळ नितीन काळे हे दोघे मित्र होते. काळे यांच्या घराजवळील कामगारांसाठी राहणाऱ्या खोल्या व गावरान कोंबड्यांची पोल्ट्री आहे. आज गुरुवार (दि.10) रोजी दुपारी दोनच्या सुमारास रिना नितीन काळे (वय-39) यांना आप्पा भरणे यांनी लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. रिना काळे यांनी मुलीच्या मदतीने भरणे यांचा फास सोडवून त्यांनी खाली उतरवून घेतल घटनेची माहिती पती नितीन काळे व पोलिसांना दिली. मात्र, आप्पा भरणे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली नसून त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप भरणे यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

संतप्त झालेल्या भरणे यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण झाले होते. रात्री उशीरा मृतदेह ताब्यात घेतला असून मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. अधिक तपास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर बनकर करत आहेत.