धक्कादायक ! शाळेत बेशुद्ध करुन ‘चिमुरडी’वर अत्याचार ; उप प्राचार्य, शिक्षकाविरोधात FIR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील एका प्रतिष्ठीत शहरातील एका शाळेतील फादरवर शाळेतील एका चौथीतील विद्यार्थीनींचा बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत प्रकरण दर्ज केले आहे. ही धोकादायक घटना झारखंडमधील धनबादमध्ये घडली. 8 वर्षांच्या लहान मुलीला बेशुद्ध करुन तिच्या बरोबर गैरवर्तन केले गेले.
Zarkhand
या प्रकरणी शाळेचे उप प्राचार्य, क्लास टीचर आणि नर्स यांच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना नर्सला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मुलीची वैद्यकिय तपासणी केली. प्राथमिक तपासात या लहान मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. परंतू अजून वैद्यकीय बोर्डाच्या फायनल रिपोर्टवर प्रकरण अजूनही अडून राहिले आहे.

मुलीच्या नातेवाईकांनी दाखल केलेल्या FIR नुसार विद्यार्थीनीची तब्येत काही दिवसांपासून खराब होती, शाळेत देखील तिला त्याचा त्रास जाणवत होता, शाळेत त्रास झाल्यावर शाळेतील लोक तीला एका रुममध्ये झोपवत असत. तेथेच मुलीला बेशुद्धीची औषधे खायला घालून त्यांच्याबरोबर गैरप्रकार करण्यात आला. मुलीच्या संवेदनशील भागावर काही व्रण दिसत असलल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले, त्यानंतर FIR दाखल करण्यात आली.
De nobali
मुलींने पोलिसांना सांगितले की, तीची तब्येत खराब झाल्यानंतर तीला एका रुममध्ये नेले जात असे, तेथे उपप्राचार्य आणि क्लास टीचर असंत, नर्स तिला बेशुद्ध होण्याचे औषध देते होती. त्यानंतर तिच्या बरोबर हे दुष्कर्म केले जात असे. शाळेच्या प्राचार्य असलेल्या तनुश्री बनर्जी यांनी सांगितले की पोलीस त्यांच्या शाळेत एका मुलीवर शारीरिक शोषण झाल्या कारणाने तपास करत आहे. शाळेत अशा प्रकारची कोणताही प्रकार होऊ शकत नाही, तरीही आम्ही पूर्ण मदत करु.

शाळेच्या प्राचार्यांनी ऑफ द रेकॉर्ड सांगितले, विद्यार्थीनी मागील 23 ऑगस्टपासून शाळेत येत नाही, शक्यता आहे की मुलीबरोबर असा प्रकार बाहेर कुठेतरी घडला असेल. तापासानंतर सर्वकाही उघड होईल. त्यांनी सांगितले की सिक रुममध्ये पुदिना हराचे औषध सोडून कोणतेही दुसरे औषध नाही.

तर आरोपींनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
सामाजिक संघटनानी हा प्रकार उचलून धरला आहे. या प्रकरणासाठी मोर्चे देखील काढण्यात येत आहे आणि मुलींला न्याय मिळावा यासाठी कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

 

You might also like