वाढदिवस विशेषांक : सुब्रमण्यम स्वामी 

 नवी दिल्ली :

१५ सप्टेंबर १९३३ रोजी चेन्नई येथे जन्मलेले सुब्रमण्यम स्वामी भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत. राजकारणात असलेले स्वामी  शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक तसेच अर्थशास्त्रज्ञ आहेत. आत्तापर्यंत ते पाच वेळा भारतीय लोकसभेत खासदार राहिले आहेत. ते १९९० -९१ या काळात केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री (व्यापार, कायदा व न्याय मंत्री) होते.भारतीय जनता पार्टीचे ते अध्यक्ष राहिले आहेत . सुब्रमण्यम स्वामी म्हंटल  कि त्यांची प्रतिमा  कॉंग्रेसविरोधी व गांधी परिवाराविषयी आक्रमक भूमिका घेणारे म्हणून लोकांच्या नजरेसमोर येते. तसेच  सुब्रमण्यम स्वामी हे वादविवाद ओढवून घेणारे व वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध आहेत. हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या स्वामींच्या घरात वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत.

सुब्रमण्यम स्वामी यांनी वयाच्या २४ व्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली. नोबेल पारितोषिक विजेते सायमन कुझनेट्स व पॉल सॅमुएल्सन यांच्या सोबत संशोधन कार्य केले व यांच्या सोबत संयुक्त लेखक रूपात “इंडेक्स नंबर थेअरी” या विषयावर लेख सादर केला. वयाच्या २७ व्या वर्षी त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात गणित विषय शिकवायला सुरुवात केली.  काही कालावधीनंतर  त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला.

[amazon_link asins=’B074XB1QDS,B01NA0IDHZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bfb2cb38-b8e4-11e8-824a-67d2cae72c11′]
आणीबाणी दरम्यान संघर्ष, तिबेट मधील कैलास -मानसरोवर यात्री मार्ग खुला करण्यासाठी प्रयत्न, भारत – चीन संबंधांत सुधारणा, भारत- इस्रायल संबंधांत सुधारणा, आर्थिक सुधारणा व हिंदू पुनरुत्थान ह्या त्यांच्या कार्यामधील ठळक बाबी आहेत.