Sugar Control | शुगर कंट्रोल करायची असेल तर दररोज ‘या’ एका फळाचे करा सेवन, जाणून घ्या कोणते

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sugar Control | असे म्हटले जाते की, रोज एक सफरचंद (Apple) खाल्ल्याने आजारांपासून दूर राहता येते. सफरचंद खाण्याचे अनेक आरोग्य फायदे (Health Benefits) आहेत. मधुमेहाच्या रुग्णांसाठी सफरचंदाचे सेवन फायदेशीर (Apples Are Good For Diabetics) आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रित (Blood Sugar Level Control) ठेवण्यासाठी औषधे घेणेच आवश्यक नाही, तर निरोगी जीवनशैली आणि सकस आहार घेणेही आवश्यक आहे. आहारातील अशा गोष्टी ज्यामुळे शुगर कंट्रोल (Sugar Control) करता येते.

 

रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने इम्युनिटी (Immunity) मजबूत राहते आणि कोलेस्ट्रॉलही (Cholesterol) नियंत्रित राहते. फायबरयुक्त सफरचंद खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि भूकही नियंत्रित राहते. लो कॅलरीज (Calories) असलेले सफरचंद खाल्ल्याने वजनही नियंत्रित (Weight Control) राहते. ब्लड प्रेशर (Blood Pressure) आणि शुगरच्या (Sugar) रुग्णांसाठीही सफरचंद फायदेशीर (Sugar Control) आहे.

 

सफरचंद कसे करते शुगर कंट्रोल (How Apple Control Sugar Level) –
सफरचंदांमध्ये कार्बोहायड्रेट्स (Carbohydrate) आणि फायबर (Fiber) असतात, त्यामुळे जर तुम्हाला मधुमेह (Diabetes) असेल तर तुमच्या कर्बोहायड्रेटच्या सेवनावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कारण तीन मॅक्रोन्यूट्रिएंट्समधील (Macronutrients) कार्ब्ज (Carbs), फॅट (Fat) आणि प्रोटीनमध्ये कार्बोहायड्रेट तुमच्या ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) सर्वात जास्त प्रभावित करते. एका मध्यम आकाराच्या सफरचंदात 27 ग्रॅम कार्ब्ज असते, परंतु त्यात 4.8 फायबर असते.

 

फायबर कार्बोहायड्रेट्सचे पचन (Digestion) आणि शोषण (Absorption) कमी करते, ज्याने ते रक्तातील शुगर लेव्हल वाढण्यापासून प्रतिबंधित करते. अनेक अभ्यासात म्हटले आहे की, फायबर टाइप 2 मधुमेहाविरूद्ध (Type 2 Diabetes) संरक्षणात्मक असू शकते आणि अनेक प्रकारचे फायबर ब्लड शुगर लेव्हल सुधारू शकते.

कार्बोहायड्रेट म्हणजे काय (What Is A Carbohydrate) ?
कार्बोहायड्रेट (Carbohydrate) हे साखरेचे रेणू असतात. प्रोटीन आणि फॅटसोबत, कार्बोहायड्रेट्स हे अन्न आणि द्रवपदार्थांमध्ये आढळणार्‍या तीन मुख्य पोषक घटकांपैकी एक आहेत. आपल्या शरीरार कार्बोहायड्रेट्सचे ग्लुकोजमध्ये (Glucose) विघटन करते. ग्लुकोज किंवा ब्लड शुगर हा शरीरातील पेशी (Cells), ऊती (Tissues) आणि अवयवांसाठी (Organs) ऊर्जेचा मुख्य स्त्रोत आहे.

 

सफरचंदाचा ब्लड शुगरवर खुप कमी परिणाम (Apples Have A Minimal Effect On Blood Sugar Levels) :
सफरचंदाचा ब्लड शुगर लेव्हलवर खुप कमी परिणाम होतो. सफरचंदांमध्ये साखर असते,
परंतु सफरचंदांमध्ये आढळणारी बहुतेक साखर फ्रक्टोज (Fructose) असते.
जेव्हा फळातील संपूर्ण फ्रुक्टोजचा वापर केला जातो तेव्हा ब्लड शुगर लेव्हलवर थोडा परिणाम होतो.

 

सोबतच सफरचंदातील फायबर साखरेचे पचन आणि शोषण मंद करते.
याचा अर्थ साखर रक्तप्रवाहात हळूहळू प्रवेश करते आणि रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवत नाही.

 

सफरचंद खाताना या गोष्टी लक्षात ठेवा (Remember These Things When Eating Apples).

– सफरचंदासोबत प्रोटीनचे सेवन करणे प्रभावी ठरते.

सफरचंदासोबत भाजलेले मखाना (Roasted Makhana) आणि पीनट बटरसारखे (Peanut Butter) प्रोटीनयुक्त अन्न खाऊ शकता.

सफरचंद फक्त सालीसह खा. अँटी-ऑक्सिडंट गुणधर्माने (Anti-oxidant Properties) समृद्ध सफरचंदाची साल शरीराला आजारांपासून वाचवते.

मधुमेहाच्या रूग्णांनी सफरचंद ज्यूसचे (Apple Juice) सेवन करू नये.
कारण सफरचंदाचा ज्यूस करताना त्यातून फायबर वेगळे केले जाते, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्ह वाढू शकते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Sugar Control | apple can also control blood sugar level know how it works

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

Mallika Sherawat Bold Bikini Photos | बोल्ड सीनमध्ये मर्यादा पार करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीनं शेअर केले असे काही फोटो, सोशल मीडियावर उडाली खळबळ

 

Gallbladder Stone | गॉलब्लॅडर स्टोनकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपचाराने करू शकता ठिक; जाणून घ्या

 

Gold-Silver Price Today | ‘सोने-चांदी’चे दर वधारले, सोने पुन्हा 51 हजारांवर तर चांदी 1 हजारांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव