शाहरुखची पोरगी करेल भल्याभल्या अभिनेत्रींची हवा ‘टाइट’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खान १९ वा वाढदिवस साजरा करते आहे. बॉलिवूडच्या स्टारकिड पैकी आपले स्टारडम बनवण्यात सुहाना खान सर्वात पुढे आहे. ती नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. सुहानाचा ड्रेसिंग सेन्स आणि तिचा लुक नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या काही गोष्टी सांगणार आहेत ज्या तुम्ही कधी ऐकल्या सुद्धा नसतील.

सुहानाने अजून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले नाही तरी सुद्धा ती तिच्या ड्रेसिंग सेन्स मुळे प्रसिद्ध आहे. जर तुम्ही तिच्या ड्रेसची किंमत ऐकली तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. सुहाना आता १९ वर्षाची झाली आहे तरी सुद्धा तिला महाग कपडे घालायची आवड आहे. मागच्या वर्षीची तिच्या लाखोंचा टी-शर्टचा फोटो व्हायरल झाला होता.

शाहरुख खानची मुलगी सध्या लंडन मध्ये शिकत आहे आणि लंडनला जाण्याआधी मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनेशनल स्कूल मध्ये शिकत होती. सुहानाला खेळामध्ये खूप रस आहे. सुहाना स्कूल मध्ये फोटबॉल स्पर्धा जिंकत आली आहे. फुटबॉल खेळाच्या व्यतिरिक्त सुहाना सध्या तिच्या वडिलांसोबत IPL मध्ये दिसून येते.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान पॉप गायिका जेन मलिकची मोठी चाहती आहे. सुहाना खान खूप चांगली लेखक आहे हे फारच थोड्या लोकांना माहित आहे. सुहानाला सर्वोत्कृष्ट कथेसाठी पौराणिक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.सुहाना खानने स्वतः बॉलीवुड अभिनेत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली. पूर्वी दिलेल्या मुलाखतीत सुहानाने सांगितले होते की, ती एक ऍक्टर बनु इच्छित आहे, ज्यासाठी ती यावेळी तयार आहे.