Suicide News | धक्कादायक ! पोटच्या दोन मुलींसह वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  पोटच्या दोन मुलीसह बापाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide News) केली आहे. रविवारी (दि. 20) सर्वत्र फादर्स डे (Father’s Day) साजरा होत असताना पोगत्यानहटी (ता. चिकोडी) येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

काडाप्पा रंगापुरे (वय 50), कीर्ती रंगापुरे (वय 18) व स्फूर्ती रंगापुरे (वय 20) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोगत्यानहटी येथील काडाप्पा रंगापुरे यांच्या पत्नी चन्‍नावा रंगापुरे (वय 40) यांचेे गेल्या आठवड्यात हृदयविकाराने निधन झाले होते. त्यामुुुळे घरातील सर्वांनाच धक्‍का बसला होता. शनिवारी रात्री काडाप्पा रंगापुरे व दोन मुलींनी घरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर चिकोडीचे डीवायएसपी मनोजकुमार नाईक, सीपीआय आर. आर. पाटील, पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राकेश बगली यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन कब्बूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले. चिकोडी पोलीस तपास करत आहेत.

Web Title :  Suicide News | father commits suicide with two daughters

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | स्वारगेट परिसरात वेटरने 3 वाहनांच्या फोडल्या काचा

Coronavirus | दिलासादायक ! राज्यातील ‘या’ 15 शहरात एकाही कोरोना रुग्णांचा मृत्यू नाही, आरोग्य विभागाची माहिती