Nashik News : महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीत गरोदर महिलेची आत्महत्या, प्रचंड खळबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण अकादमीमध्ये (MPA) एका गरोदर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. काही दिवसांपूर्वी एका युवकाने अकादमीमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज (सोमवार) ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

पल्लवी प्रमोद गायकवाड (वय-30 रा. एमपीए कर्मचारी वसाहत) असे आत्महत्या करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी जितेंद्र गोपीनाथ दिवे यांनी गंगापुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारनंतर अकादमीमधील कर्मचारी पल्लवी गायकवाड यानी राहत्या घरात छताला असलेल्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी घरामध्ये कोणी नव्हते. पल्लवी गायकवाड यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. पल्लवी या पाच ते सहा महिन्यांच्या गरोदर होत्या. पुढील तपास गंगापुर पोलीस करीत आहेत.