Sumitra Sen | सुप्रसिद्ध गायिका सुमित्रा सेन यांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पोलीसनामा ऑनलाइन : नववर्षाच्या सुरुवातीलाच संगीत विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय गायिका सुमित्रा सेन यांचे (Sumitra Sen) वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी कोलकत्यातील त्यांच्या राहत्या घरातच अखेरचा श्वास घेतला. सुमित्राच्या (Sumitra Sen) जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सध्या त्यांच्या जाण्याने संगीत विश्‍वात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. सुमित्रा सेन यांच्या निधनाची बातमी त्यांची मुलगी स्रबानी सेन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. यावेळी स्रबानी यांनी बंगाली भाषेत केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आज आई आम्हाला सोडून गेली”. सध्या स्रबानी यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत सुमित्रा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुमित्रा ह्या गेल्या अनेक दिवसांपासून वृद्धापकाळतील आजारांशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर गंभीर Bronchopneumonia आजारावर उपचार सुरू होते. 2 जानेवारी रोजी त्यांची प्रकृती बिघडली आणि 3 जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले.

सुमित्रा (Sumitra Sen) यांचा 2012 मध्ये पश्चिम बंगालच्या सरकारने ‘संगीत महासन्मान’ हा पुरस्कार देऊन गौरव केला होता. सुमित्रांनी आजवर ‘मेघ बोलते जबो जबो’, ‘तोमारी जर्नातलार निर्जोन’, ‘सखी भावना कहारे बोले’ यासारखे रवींद्र संगीतांसाठी त्या प्रसिद्ध होत्या. त्याच्या दोन्ही मुली स्रबानी सेन आणि इंद्राणी सेन हे देखील रवींद्र संगीत गायनाचा वारसा पुढे नेत आहेत.

सुमित्रा सेन यांच्या निधनावर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही शोक व्यक्त करत म्हणाले की,
“अनेक दशकांपासून प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या सुमित्रा सेन यांच्या अकस्मात निधनामुळे मला खूपच दुःख
होत आहे. त्यांच्याबरोबर माझे अनेक वर्षापासून जवळचे संबंध होते.
त्यांच्या जाण्याने संगीत जगात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे”.

Web Title :- Sumitra Sen | rabindra sangeet legend sumitra sen passes away at the age of 89

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mahavitaran Strike | संपाच्या 72 तासांमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था पूर्णत्वास ; पुणे परिमंडलामध्ये पर्यायी मनुष्यबळाद्वारे 24 तास सेवा राहणार

Maharashtra Politics | मोदींनी नारायण राणेंना चांगलेच खडसावले; ठाकरे गटातील ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

MP Amol Kolhe | छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक’ की ‘धर्मवीर’?, खा. अमोल कोल्हेंनी स्पष्ट केली भूमिका (व्हिडीओ)