Sunanda Rajendra Pawar | पुणे : स्वतःला कमी लेखू नका, स्वतःच्या हिमतीवर काम करायला शिका; सुनंदाताई राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन

श्रीयश एज्युकेशन फौंडेशन तर्फे ‘आदर्श महिला सन्मान पुरस्कार सोहळा 2023’ चे वितरण

 

पुणे : Sunanda Rajendra Pawar | महिला एकत्रित येऊन उत्तम काम करतात याचे कौतुक मला नेहमीच असते. राजकीय व्यासपीठावर जायला मला आवडत नाही किंतू समाजकार्याची रुची असल्यामुळे मी अश्या कार्यक्रमाला जात असते. परिवारात राजकीय क्षेत्राचा एवढा मोठा पाठिंबा असताना कधीही त्याचा उपयोग मी करून घेतला नाही आणि करून घेणार नाही. तुम्ही तुमच्या हिमतीवर सर्वकाही मिळू शकता, स्वतःला कमी लेखू नका असे प्रतिपादन भीमथडी यात्रेच्या (Bhimthadi Yatra) आयोजका सुनंदा राजेंद्र पवार (Sunanda Rajendra Pawar यांनी केले.

जागतिक महिला दिन, देशाचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून श्रीयश एज्युकेशन फौंडेशन (Shri Yash Education Foundation) यांच्या वतीने आणि G20, C20 यांच्या सौजन्याने सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, राजकीय आदी विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या सत्तर (७०) महिलांचा आदर्श महिला सन्मान पुरस्कार सोहळा 2023 चे वितरण सुनंदाताई राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले; या प्रसंगी त्या बोलत होत्या. रविवारी विद्यार्थी सहायक समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माईंड पॉवर ट्रेनर दत्ता कोहिनकर, केअर टेकर सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे, गुरुवर्य श्रीकांत धुमाळ गुरुजी, विद्यार्थी सहाय्यक समितीचे चंद्रकांत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य आयोजन व्यावसायिक मार्गदर्शक श्रीकृष्ण सावंत, यांच्यासह श्रीयश एज्युकेशन फौंडेशनच्या अध्यक्षा सुप्रियाताई सावंत, उपाध्यक्ष हेमलता फडतरे, खजिनदार नीलिमा पारवडे, सचिव राजश्री शिंदे, विश्वस्त शिवानंद पडिले, दिनेश पवार व श्रीराम सावंत तसेच संस्थेचे सर्व सदस्य व मित्रपरिवार यांनी केले होते. (Sunanda Rajendra Pawar)

मार्गदर्शन करताना दत्ता कोहिनकर म्हणाले, कौतुक ही प्रत्येक माणसाची आंतरिक भूक आहे;
ती जर पूर्ण करता आली तर तुम्ही सुखी- समाधानी जीवन जगू शकता.
नवऱ्याने बायकोचे तर बायकोने नवऱ्याचे कौतुक केले तर घरातले वाद मिटतील.
तसेच व्यवसाय करताना ग्राहकांचेही कौतुक करा त्याने ग्राहक कायम स्वरूपी तुमच्याशी जोडला जाईल
आणि व्यवसायात वृद्धी होण्यास मोठी मदत होईल.

प्रास्ताविक भाषणात श्रीकृष्ण सावंत यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा दिला तर पुढील वाटचाली विषयी सूचित केले.
श्रीकांत धुमाळ गुरुजी यांनी देखील कार्याचे कौतुक करून महिला भगिनींना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम सावंत यांनी तर आभार सुप्रिया सावंत यांनी मानले.

Web Title :- Sunanda Rajendra Pawar Pune : Don’t underestimate yourself, learn to work on your own courage; Proposition by Sunanda Rajendra Pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | अजित पवार भाजपसोबत येणार का? केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान, म्हणाले – ‘फक्त अजित पवारच नाही तर…’

Namo Awas Yojana | ‘नमो आवास’ योजनेंतर्गत तीन वर्षात १० लक्ष घरे निर्माण होणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

NCP Chief Sharad Pawar | ‘… भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही’, सत्यपाल मलिकांनी पुलवामा हल्लाबाबत केलेल्या विधानावर शरद पवारांचा हल्लाबोल