Sunny Leone | ‘या’ कारणामुळे आता दीपिका पाठोपाठ ‘ही’अभिनेत्री देखील होत आहे ट्रोल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sunny Leone | सध्या सोशल मीडियावर ‘पठाण’ चित्रपटातील गाणे राज्यात राजकीय वळण घेताना दिसत आहे. या गाण्यांमध्ये दीपिका पादुकोणने भगव्या रंगाची बिकनी परिधान केल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी आणि हिंदू संस्थांनी तिच्यावर आक्षेप नोंदवत पठाण चित्रपटाचा निषेध केला आहे. या संपूर्ण घटना ताज्या असतानाच आता अभिनेत्री सनी लिओनीने (Sunny Leone) असे कृत्य केले आहे की ज्यामुळे तिला देखील नेटकरी ट्रोल करत आहेत.

 

दीपिका पादुकोणच्या भगव्या बिकनीवरून वाद सुरू असतानाच आता सनी लिओनीने देखील भगव्या रंगाची बिकनी परिधान करून बीच शूट केले आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सनीने आगीत तेल ओतण्याचे काम केल्याचे म्हटले जात आहे. तर सोशल मीडियावर दीपिका इतकीच सनी देखील सध्या ट्रोल होऊ लागली आहे.

सनीच्या (Sunny Leone) या व्हिडिओवर आता अनेक कमेंट्स येत आहेत. तर एका नेटकऱ्याने म्हटले आहे की,
“अरे आता हिने पण भगव्या रंगाची बिकनी घातली आहे….. चला हिला पण ट्रोल करूया”. तर अन्य एकाने लिहिले की,
“आता तुला पण बॉयकॉट करणार”. तर दुसऱ्या एका नेटकऱ्यांनी म्हटले की,
“तुम्हाला आमच्या भावनांशी खेळायला का आवडतं?…. निषेध”. एकाने तर चक्क म्हटले की,
“तुझी आणि दीपिकाची काहीही तुलना होऊ शकत नाही मात्र यंदा तुम्ही दोघींनी भगव्या रंगाचा हिंदू धर्माचा अपमान केला आहे”.

 

Web Title :- Sunny Leone | after deepika the ya actress wore saffron hot poses at the beach

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Tips | “या” वस्तूने कमी होईल वाढणारे वजन; अलाया एफ (Alaya F) सारखे सपाट पोट

Bank Rules Change | १ जानेवारीपासून बदलणार बँकेचे हे नियम, जाणून घ्या तुमच्यावर कोणता परिणाम होणार

Ankita Lokhande | टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेचे बोल्ड फोटो होताहेत व्हायरल