कबीर बेदीनं मागितला ‘पर्सनल’ कॉन्टॅक्ट नंबर, ‘बेबी डॉल’ सनीनं दिला ‘तो’ नंबर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्ट्रेस सनी लिओनी आपल्या अॅक्टींगव्यतिरीक्त स्वभावामुळेही चर्चेत असते. सनी सर्वांशीच खूप नम्रतेनं बोलत असते. लोक तिच्या अॅक्टींग व्यतिरीक्त स्वभावामुळेही तिचे चाहते आहेत. अलीकडेच सनी डब्बू रतनानीच्या इव्हेंटमध्ये आली होती. यावेळी तिनं असं काही केलं की, तिच्या चाहत्यांना आपलं हसू आवरणं शक्य झालं नाही.

एका इंग्रजी वृत्तानुसार, दिग्गज कलाकार कबीर बेदीनं डब्बू रतनानीच्या कॅलेंडर लाँचदरम्यान सनी लिओनीला तिचा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर मागितलात परंतु सनी लिओनीनं मात्र तिचा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर देण्याऐवजी तिचा पती डॅनियल वेबरचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. ही गोष्ट लक्षात येताच तेथील चाहत्यांना आपलं हसू आवरणं शक्य झालं नाही.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती. सनी सध्या 2 टीव्ही शो करत आहे. तिच्याकडे एक हिंदी आणि एक साऊथचा सिनेमा आहे जो तिच्या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. सनी सिटी मीडिया अँड एंटरटेंमेंट असं या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आहे.

 

You might also like